'देशाला मोदीच वाचवू शकतात', चिठ्ठी लिहून केली आत्महत्या

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

हैदराबादः पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच देशाचे कायम पंतप्रधान राहावेत… मोदीच देशाला वाचवू शकतात, याशिवाय अन्य मजकूर लिहून एका युवकाने आत्महत्या केली आहे.

हैदराबादः पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच देशाचे कायम पंतप्रधान राहावेत… मोदीच देशाला वाचवू शकतात, याशिवाय अन्य मजकूर लिहून एका युवकाने आत्महत्या केली आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, नरसिंग (वय 30) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून, त्यांनी सैदाबाद परिसरातील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. शहरातील एका खासगी संस्थेत ते काम करत होते. संस्थेत वरिष्ठांकडून होणाऱ्या छळामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मात्र, आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यामध्ये लिहीले आहे की, 'वरिष्ठांकडून छळ केला जात असल्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेत आहे. शिवाय, पंतप्रधान मोदी हेच देशाचे कायम पंतप्रधान राहावेत…मोदीच देशाला वाचवू शकतात.'

पोलिस निरीक्षक एन. मोहन राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, नरसिंगला राजकारणाबद्दल आवड होती आणि राजकारणाबद्दल स्वतःचे मत नेहमी मांडायचा. नरसिंगच्या मृत्यूबाबत तक्रार दाखल झाली असून, याबाबतचा पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Narendra modi shoud be pm forever write note and youth suicide