ट्रम्प भारतात आल्यानंतर मोदींचा 'तो' फोटो व्हायरल

वृत्तसंस्था
सोमवार, 24 फेब्रुवारी 2020

ट्रम्प यांचे आज (सोमवार) सकाळी भारतात आगमन झाले. अहमदाबाद विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी स्वतः मोदी हजर होते. ट्रम्प यांनी मोटेरा स्टेडियममध्ये केलेल्या भाषणामध्ये मोदींचे तोंडभरून कौतुक करत त्यांच्या नेतृत्वाखाली भारत प्रगती करत असल्याचेही म्हटले आहे.

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारत दौऱ्यावर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे भव्य स्वागत केले. पण, याच मोदींचे अमेरिकेच्या अध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊस बाहेरील फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

narendramodi-1994-us

ट्रम्प यांचे आज (सोमवार) सकाळी भारतात आगमन झाले. अहमदाबाद विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी स्वतः मोदी हजर होते. ट्रम्प यांनी मोटेरा स्टेडियममध्ये केलेल्या भाषणामध्ये मोदींचे तोंडभरून कौतुक करत त्यांच्या नेतृत्वाखाली भारत प्रगती करत असल्याचेही म्हटले आहे. चहावाला ते पंतप्रधानपद अशी झेप घेणाऱ्या मोदींनी 1994 मध्ये अमेरिका दौऱ्यावर व्हाईट हाऊसबाहेर काढलेला फोटो सध्या खूप व्हायरल होत आहे. 

1994 मध्ये अमेरिकन कौन्सिल ऑफ यंग पॉलिटिकल लिडर्स यांनी जगभरातील युवा नेत्यांना आमंत्रित केले होते. यावेळी मोदी यांच्यासह जी. किशन रेड्डी हेही होते. यावेळी मोदींनी व्हाईट हाऊसबाहेर फोटो काढला होता. आता हेच मोदी अमेरिकेच्या अध्यक्षांसोबत उभे असल्याने त्यांचे सोशल मीडियात कौतुक करण्यात येत आहे. मोदी यांच्यावर अमेरिकेने 2002 च्या गुजरात दंगलीनंतर व्हिसा नाकारला होता. मात्र, पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर अमेरिकेने त्यांच्यावरील बंदी उठविली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narendra Modi Standing In Front of The White House In US