आता केंद्रात पुन्हा 'नमो-नमो'!

आता केंद्रात पुन्हा 'नमो-नमो'!

नवी दिल्ली :  देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए-2) सरकार आज (गुरुवार) स्थापन झाले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नरेंद्र मोदी यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. त्यामुळे आता केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेवर आले आहे.

राष्ट्रपती भवनाच्या प्रांगण येथे नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळाचा शपथविधी आज संपन्न झाला. मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात मोदींसह सुमारे 50 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. यामध्ये एनडीएतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या अरविंद सावंत यांची कॅबिनेट मंत्रिपदावर वर्णी लागली आहे. तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना कॅबिनेट मंत्रिपदी बढती मिळाली आहे. या सर्व नेतेमंडळींसह भाजपच्या विद्यमान मंत्र्यांनाही पद आणि गोपनियतेची शपथ देण्यात आली. 

महाराष्ट्रातून जावडेकर, गडकरी

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात विद्यमान मंत्र्यांनाही स्थान देण्यात आले आहे. यामध्ये प्रकाश जावडेकर, पियूष गोयल, नितीन गडकरी यांच्या नावांचा समावेश आहे.

रावसाहेब दानवेंना पुन्हा संधी

भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. यापूर्वी त्यांना मोदी सरकारच्या (एनडीए-1) मंत्रिमंडळात घेण्यात आले होते. मात्र, कालांतराने त्यांना पुन्हा राज्यात पाठविण्यात आले होते. 

नवनिर्वाचित खासदार धोत्रेंना संधी

अकोल लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले भाजपचे खासदार संजय धोत्रे यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com