नोटाबंदीचा निर्णय जगाच्या अभ्यासाचा- मोदी

Narendra Modi
Narendra Modi

नवी दिल्ली - नोटाबंदीचा निर्णय हा ऐतिहासिक आहे. हा निर्णय जगाच्या अभ्यासाचा विषय ठरु शकतो. इतक्‍या मोठ्या निर्णयाचे परिणाम समजून घेण्यास वेळ लागू शकतो. नोटाबंदीच्या निर्णयामध्ये देशाचे भले करण्याची क्षमता असल्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलेल्या अभिभाषणाला उत्तर देताना पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन केले. तसेच सरकारच्या विविध योजनांबाबतची माहिती दिली.

पंतप्रधान मोदी म्हणाले...

  • भारतामध्ये नोटाबंदीची शिफारस वांचू समितीने फार वर्षे आधीच केली होती. मात्र, निवडणुकांत नुकसान होण्याच्या भीतीने इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने या शिफारशीची अंमलबजावणी केली नाही. 
  • चोरांना शासन झाल्याशिवाय प्रामाणिक नागरिकांचे सक्षमीकरण होणार नाही. 
  • देशातील गरीब व मध्यमवर्गाच्या महत्त्वाकांक्षांना भ्रष्टाचाराचा फार मोठा फटका बसला आहे. 
  • भ्रष्टाचार व काळ्या धनाविरोधातील लढाई ही राजकीय लढाई नाही. देशातील एखाद्या राजकीय पक्षास अडचणीत आणण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेतला गेला, असा विचार करणे सर्वथा चुकीचे आहे.
  • नोटाबंदीचा निर्णय हा ऐतिहासिक आहे. हा निर्णय जगाच्या अभ्यासाचा विषय ठरु शकतो. इतक्‍या मोठ्या निर्णयाचे परिणाम समजून घेण्यास वेळ लागू शकतो. नोटाबंदीच्या निर्णयामध्ये देशाचे भले करण्याची क्षमता. 
  • देशामधील अशिक्षित वर्गानेही नोटाबंदीच्या निर्णयास पाठिंबा दर्शविला. ही बाब अत्यंत अभिमानास्पद आहे  
  • स्नानगृहामध्ये रेनकोट घालून स्नान कसे करावे, ही कला डॉ. मनमोहन सिंग यांच्यापेक्षा अधिक चांगले कोणाला अवगत आहे?!
  • देशामध्ये सध्या दोन तट पडले आहेत. एका बाजुला देशामधील जनता व केंद्र सरकार आहे; तर दुसरीकडे राजकीय नेते आहेत
  • आपल्या देशाचे सामर्थ्य कमी आहे, अशी कल्पना करुन घेऊ नका
  • आपल्या देशाचे सामर्थ्य कमी आहे, अशी कल्पना करुन घेऊ नका
  • जेव्हा आम्ही "ईव्हीएम' यंत्रांद्वारे मतदानास प्रारंभ केला; तेव्हा हा देश इतक्‍या सहजपणे ही व्यवस्था स्वीकारेल, अशी कोणी कल्पना तरी केली होती काय?
  • सभागृहामध्ये विरोधी पक्षांतील विविध नेत्यांनी देशामधील अनेक समस्यांचा उल्लेख त्यांच्या भाषणांत केला. बहुतेक ते त्यांच्या कामगिरीचे प्रगतीपुस्तकच सादर करत होते!
  • डिजिटल योजनांसाठी सरकार कोट्यवधींचा खर्च का करत आहे, अशी विचारणा कॉंग्रेस नेते आनंद शर्माजी यांनी केली. मी त्यांना सांगु इच्छितो - "भीम" ऍपसाठी एक जास्तीचा रुपया खर्च करण्यात आलेला नाही.
  • आम्ही रिझर्व्ह बॅंकेची स्वायत्तता आणखी मजबूत केली. आरबीआयच्या गव्हर्नरच्या भारतीय अर्थव्यवस्थेविषयीच्या भूमिकेसंदर्भात आपण सकारात्मकता बाळगणे आवश्‍यक आहे. प्रत्येक वादामध्ये आरबीआय व आरबीआय गव्हर्नरला ओढणे योग्य नाही.
  • देशात 700 माओवाद्यांनी शरणागती पत्करली आहे. माओवाद्यांनी इतक्‍या मोठ्या संख्येने याआधी कधीही शरणागती पत्करली नव्हती. तर शत्रु देशांमध्ये बनावट भारतीय चलन छापणाऱ्या काही जणांनी आत्महत्या केली आहे.
  • देश बदलण्यासाठी आधी मानसिकता बदलणे आवश्‍यक
  • स्वच्छ भारत मोहिमेचीही लोकांनी टिंगल केली, हे पाहून आश्‍चर्य वाटले.
  • "एक भारत श्रेष्ठ भारत' हा भारतास देश म्हणून एकत्र आणण्याचा एक प्रयत्न 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com