'मोदी गरीब असल्याने त्यांना लक्ष्य केले जाते'

वृत्तसंस्था
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

लखनौ : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गरीब कुटुंबातून आलेले असल्याने त्यांना लक्ष्य करण्यात येत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी केले. तसेच, राजकीय पक्ष "असहिष्णू" असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

"काँग्रेस बऱ्याच काळापासून सरंजामशाहीच्या मानसिकतेने प्रभावित झालेला आहे. अशाच प्रकारच्या विचारप्रक्रियेने समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर गारुड घातले आहे. गरिबांच्या पाठिंब्याचा फायदा डावे पक्ष घेत होते. मात्र गरिबांनी आता मोदी आणि त्यांच्या धोरणांना जवळ केल्याने तेही आता हताश झाले आहेत."

या राजकीय पक्षांना मतदार मतपेटीतून चोख प्रत्युत्तर देतील असा विश्वास केंद्रीय जलसंधारण, नदी सुधारणा आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्री असलेल्या भारती यांनी व्यक्त केला. 
'भाजपच्या बाजूने लाट असून, 1991 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये होता त्यापेक्षाही पक्ष मोठा आणि मजबूत होत असल्याचे त्यातून दिसत आहे,' असे त्या म्हणाल्या. 
 
Web Title: Narendra Modi targeted as he is from poor family: Uma Bharti