मोदींनी योग करतानाचा अ‍ॅनिमेटेड व्हिडीओ केला ट्विट

वृत्तसंस्था
गुरुवार, 6 जून 2019

मोदींनी ट्वीट केलेल्या व्हिडीओमध्ये ते त्रिकोणासन करत असल्याचे पाहायला मिळत आहेत.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाचा एक ऍनिमेटेड व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओमध्ये नरेंद्र मोदी यांचे अॅनिमेटेड व्हर्जन योगा पाहायला मिळत आहे.

मोदींनी ट्वीट केलेल्या व्हिडीओमध्ये ते त्रिकोणासन करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. शिवाय, या व्हिडीओद्वारे 21 जून रोजी साजरा केला जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी तयार राहण्याचे आवाहन केले आहे.

ट्विटमध्ये मोदींनी म्हटले आहे, '21 जून रोजी आपण योग दिन साजरा करणार आहोत. मी आवाहन करतो की, तुम्ही सर्वांनी योगाला तुमच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनवावा. शिवाय, इतरांनाही योग करण्यासाठी प्रेरित करा. योगाचे फायदे खूप जबरदस्त आहेत.'

दरम्यान, 21 जून 2015 रोजी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला गेला. 21 जून हा दिवस वर्षातला सर्वात मोठा दिवस असतो. हा दिवस माणसाचे दिर्घायुष्य दर्शवतो. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी या दिवसाची निवड करण्यात आली आहे.

केंद्र सरकारतर्फे नवी दिल्ली, शिमला, म्हैसूरु, अहमदाबाद आणि रांचीमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राष्ट्रीय स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर हा त्यांचा पहिला मोठा सार्वजनिक कार्यक्रम असणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narendra Modi twitt Animated Video doing yoga