मोदींनी केले चार वर्षांत 84 देशांचे दौरे

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 जुलै 2018

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या चार वर्षात 84 देशांचे दौरे केले असून, यासाठी 1487 कोटी रुपये खर्च झाला आहे, अशी माहिती केंद्र सरकारने आज (शुक्रवार) दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे 2014 मध्ये पंतप्रधानपद हाती घेतल्यापासून एकूण ८४ देशांचा दौरा केला आहे. परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी राज्यसभेत एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले की, 'मोदींच्या 84 देशांच्या दौऱयामध्ये चार्टर्ड विमाने, विमानांची देखभाल आणि हॉटलाइन सुविधांसाठी एकूण 1484 कोटींचा खर्च करण्यात आला असल्याचे सांगितले.'

आकडेवारीनुसार, 15 जून 2014 ते 10 जून 2018 दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विमान देखभालीसाठी एकूण 1088.42 कोटी रुपये आणि चार्टर्ड विमानांवर 387.26 कोटी रुपये खर्च करण्यात आले. हॉटलाइनसाठी एकूण 9.12 कोटी रुपये खर्च आला.

मोदींचे परदेश दौरे-

  1. 2014 ते 15 - 13 देश
  2. 2015 ते 16 - 24 देश
  3. 2016 ते 17 - 18 देश
  4. 2017 ते 18 - 19 देश
  5. 2018 - 10 देश
Web Title: Narendra Modi visits 84 countries during four years