BJP Foundation Day : भाजप स्थापनादिनी मोदींकडून कार्यकर्त्यांना शुभेच्छा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 एप्रिल 2019

मोदींनी आज सकाळी ट्विट करून भाजपच्या कार्यकर्त्यांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनीही भाजप कुटूंब व कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

नवी दिल्ली : सरकारमध्ये असलेल्या भारतीय जनता पक्षाचा आज 39वा स्थापना दिन! भारतीय जनता पक्षाची स्थापना 6 एप्रिल 1980 रोजी झाली. भारतीय जनसंघ व जनता पक्ष यांना अनुसरून पुढे भारतीय जनता पक्षाची स्थापना करण्यात आली. हिंदुत्त्व, सामाजिकता, समान नागरिकत्व, समानता ही भाजपची काही महत्त्वाची तत्त्वे आहेत. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी भाजपचे पहिले अध्यक्ष होते. भाजपची धोरणे ही उजव्या विचारधारेप्रमाणे चालणारी आहेत.

अटलबिहारी वाजपेयींनंतर, लालकृष्ण अडवानी, मुरली मनोहर जोशी, कुशाभाऊ ठाकरे, बंगारू लक्ष्मण, जन कृष्णमुर्ती, व्यंकय्या नायडू, राजनाथ सिंह, नितीन गडकरी व सध्या अमित शहा हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. भाजपने 4 वेळा केंद्रात सत्ता मिळवली. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ही भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. 

मोदींनी आज सकाळी ट्विट करून भाजपच्या कार्यकर्त्यांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनीही भाजप कुटूंब व कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

 

 

 

Web Title: Narendra Modi wishes part workers on BJP Foundation Day