मोदींनी इन्स्टाग्रामवरून सांगितलं, अमित शहा आणि ते काय करणार!

शुक्रवार, 24 मे 2019

- नरेंद्र मोदींनी केलीये याबाबतची पोस्टही

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक निकालांचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काल (ता. 23) सायंकाळी जनतेसमोर विजयी मुद्रा दाखवत संवाद साधला. त्यानंतर आज (ता. 24) मोदींनी एक इंस्टाग्राम पोस्ट केली आहे. त्यामध्ये 'आम्ही दोघं एकत्र मिळून काय काय करणार' याबद्दल सांगितले आहे.

मोदींच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून त्यांनी अमित शहा व त्यांचा फोटो शेअर केलाय. या पोस्टला 'आम्ही एकत्र वाढलो, एकत्र समृद्ध झालो आणि आता एकत्र मिळून आम्ही मजबूत आणि सर्वसमावेशक भारत घडवू' असे कॅप्शन दिले आहे. या पोस्टमधील फोटोत मोदी व शहा जनतेचे आभार मानत आहेत व अभिवादन करत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Together we grow. Together we prosper. Together we will build a strong and inclusive India.

A post shared by Narendra Modi (@narendramodi) on

दरम्यान, मोदी कायमच सोशल मीडियाचा प्रभावी वापर करताना दिसतात. या निवडणुकीत मोदींच्या आयटी सेलने इंस्टाग्रामचा पुरेपूर वापर केला होता. आजची त्यांची ही पोस्ट शहा व मोदींमधील मैत्रीपूर्ण संबंधच दर्शवत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narendra Modi written Post on Instagram about Future plans