अवकाश मोहिमेपासून, डिजीटल व्यवहारांपर्यंत मोदींनी केली 'मन की बात'

वृत्तसंस्था
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली : "मन की बात' या कार्यक्रमाच्या 29 व्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला. यशस्वी अवकाश मोहिमेबद्दल इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या अभिनंदनापासून डिजीटल व्यवहार, अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन, सरकारच्या मोहिमांचे यश याबाबत मोदी यांनी भाष्य केले.

"मन की बात' कार्यक्रमातील प्रमुख मुद्दे -

  • मंगळवारील मंगलयानाच्या यशस्वी मोहिमेनंतर इस्रोने अलिकडेच अवकाश क्षेत्रात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
  • सुरक्षेच्या दृष्टिने अत्यंत महत्वाची असलेली बॅलेस्टिक इंटरसेप्टर क्षेपणास्त्राचे मोहिम भारताने यशस्वी केली आहे.
  • "डिजीधन' योजनेत प्रचंड उत्साह दिसून येत आहे. लोक डिजीटल चलनाकडे वळत आहेत. डिजीटल व्यवहार वाढत आहेत.
  • डॉ. बाबासाहेबांच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण प्रत्येकाने "भीम' ऍपच्या वापराबद्दल किमान 125 व्यक्तींनी माहिती द्यावी.
  • शेतकऱ्यांच्या कष्टामुळे 2700 लाख हेक्‍टर परिसरात अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन झाले आहे.
  • रिओ पॅरालोम्पिकमध्ये भारतातील दिव्यांगांनी मिळविलेल्या यशाचे भारतभर स्वागत करण्यात आले.
  • अंधांसाठीची टी-20 क्रिकेट विश्‍वकरंडक जिंकल्याबद्दल आणि महिला खेळाडूंनी एशियन रग्बी सेव्हन करंडक जिंकल्याबद्दल त्यांचे अभिनंदन
  • "बेटी बचाओ, बेटी पढाओ' अभियानाने गती घेतली आहे. ती आता जनसाक्षरतेची मोहिम बनली आहे.
  • येत्या आठ मार्चला साजऱ्या करण्यात येणाऱ्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला समान आहेत हा एकच भाव आपल्या मनात आहे.
Web Title: Narendra Modi's 'Man ki baat' - 29th programme