'मन की बात'मुळे आकाशवाणीला कोट्यावधींचा फायदा

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' या कार्यक्रमामुळे आकाशवाणीला वर्षेभरात 4.78 कोटी रुपयांचा फायदा झाला आहे, अशी माहिती प्रसारण राज्यमंत्री राजवर्धनसिंग राठोड यांनी लोकसभेत दिली.

लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना राठोड म्हणाले, 'मन की बात' या कार्यक्रमुळे सन 2015-16 मध्ये आकाशवाणीला 4,78,22,480 रुपयांचा फायदा झाला आहे. आकाशवाणीने गेल्या वर्षेभरात 447.76 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सन 2014-15 मध्ये 435.1 कोटी रुपये एवढी होती. सन 2014 मध्ये सुरू झालेल्या 'मन की बात' कार्यक्रमाचे आतापर्यंत 26 कार्यक्रम प्रसारीत झाले आहेत.'

नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी संवाद साधण्यासाठी रेडिओवरून 'मन की बात' हा कार्यक्रम सुरू केला असून, याला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

Web Title: Narendra modi's mann ki baat