नोटा बदलण्यासाठी मोदींच्या आई बँकेच्या रांगेत

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून 500 आणि 1000च्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला.

गांधीनगर - नोटा बदलण्यासाठी देशभरातील नागरिक बँकांबाहेर रांगेत उभे असताना आज (मंगळवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी याही नोटा बदलण्यासाठी बँकेत पोहचल्या.

गांधीनगर येथील ओरिएँटल बँकेच्या शाखेत त्या कुटुंबीयांसह पोहचल्या होत्या. पाचशेच्या नऊ नोटा असे साडेचार हजार रुपये त्यांनी बदलून घेतले. गुरुनानक जयंतीमुळे सोमवारी बँकांना सुट्टी असल्याने आज बँकांबाहेर नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. पहाटेपासून नागरिक बँकांबाहेर उभे आहेत.

नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून 500 आणि 1000च्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला. नागरिकांजवळील नोटा 30 डिसेंबरपर्यंत बँक आणि पोस्ट ऑफिसमध्ये बदलून मिळणार आहेत. या निर्णयामुळे देशभरात बँकांबाहेर नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

Web Title: narendra modi's mother Heeraben Modi gets new currency notes at a bank in Gandhinagar