मोदींच्या नोटाबंदीच्या यज्ञात गरिबांचा बळी - राहुल गांधी

वृत्तसंस्था
बुधवार, 28 डिसेंबर 2016

सरकारकडून गरिबांचा बळी देण्यात येत आहे. देशाचे किती नुकसान झाले याची माहिती सरकारने द्यावी. आठवड्याला 24 हजार रुपये काढण्याची मर्यादा सरकारने वाढविली पाहिजे. 50 दिवसांनंतर देशात काहीही नीट झालेले नाही.

नवी दिल्ली - देशातील 50 उद्योगपती कुटुंबासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा यज्ञ केला. या यज्ञात त्यांनी गरिबांचा बळी दिला. या निर्णयापासून 50 दिवसांत देशात काहीही बदल झालेला नाही, अशी जोरदार टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.

काँग्रेसच्या स्थापनादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयावर टीका केली. पंतप्रधान मोदींनी नोटाबंदीचा निर्णय कोणाला विचारुन घेतला, हे सरकारने जनतेला सांगावे? नोटाबंदीमुळे किती नागरिकांचा मृत्यू झाला? तसेच त्यांना मदत म्हणून किती पैसे देण्यात येणार आहेत? नोटबंदीमुळे किती काळा पैसा बाहेर आला?, देशाच्या अर्थव्यवस्थेवर किती परिणाम झाला?, असे काही प्रश्न राहुल यांनी सरकारला विचारले आहेत.

राहुल गांधी म्हणाले, की सरकारकडून गरिबांचा बळी देण्यात येत आहे. देशाचे किती नुकसान झाले याची माहिती सरकारने द्यावी. आठवड्याला 24 हजार रुपये काढण्याची मर्यादा सरकारने वाढविली पाहिजे. 50 दिवसांनंतर देशात काहीही नीट झालेले नाही. नोटाबंदीमुळे अनेकांना रोजगार गमवावे लागले आहेत. याची आकडेवारीही सरकारने जाहीर करावी.

Web Title: narendramodi should waive loans of farmers as they has suffered huge losses due to demonetisation: Rahul Gandhi