केरळमधील पावसाचे नासाने शोधले कारण 

पीटीआय
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

वॉशिंग्टन (पीटीआय) : नासा या अमेरिकेच्या अवकाश संस्थेने उपग्रहाकडून मिळालेल्या आकड्यांचा वापर करताना एक व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये केरळातील पाऊस आणि पुराच्या स्थितीची भयानकता समोर येते. 

भारतात सर्वसाधारणपणे या काळात मॉन्सूनचे आगमन होते आणि या भागात मोठा पाऊस पडतो. त्यातही सामान्य मॉन्सूनच्या काळात वेळोवेळी कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊ शकते. त्यामुळे जोरदार पाऊस पडतो. नासाने एका निवेदनात म्हटले आहे, की हिमालयाची भौगोलिक स्थिती आणि पश्‍चिम घाटामुळे दक्षिण-पश्‍चिम किनारपट्टीवर जोरदार पाऊस होत आहे.

ही पर्वतरांग हिमालयाएवढी मोठी नाही. मात्र, भारताच्या पश्‍चिमी किनारपट्टीला समांतर आहे. याची अनेक शिखरे 2 हजार मीटरपेक्षाही अधिक उंच आहेत. अशा प्रकारे पाहिल्यास पश्‍चिम घाटातील प्रतिकूल स्थितीमुळे भारताच्या पश्‍चिमी किनारपट्टी भागात जोरदार पाऊस पडत आहे. दक्षिण-पश्‍चिम मॉन्सूनअंतर्गत उत्तरी हिंद महासागर आणि अरबी समुद्रातून येणाऱ्या गरम हवेतील बाष्प या पर्वतश्रेणीला धडकत आहे. त्यामुळे मोठा पाऊस पडत आहे. 

Web Title: NASA found Reasons for the rainy season in Kerala