देशवासीय त्रस्त; सरकार निर्लज्ज: काँग्रेस

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नोटा बदलण्याच्या नियमांत वेळोवेळी केलेल्या बदलांबाबत काँग्रेसने तीव्र शब्दांत टीका केली आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर 100 पेक्षा अधिक वेळा नियमात बदल केले आहेत आणि आतापर्यंत 100 पेक्षा अधिक जण मृत्युमुखी पडले आहेत. मात्र, सरकारमध्ये काहीही फरक पडलेला नसून देशवासियांना त्रास होत असतानाही सरकार हाच प्रकार निर्लज्जपणे सुरु ठेवत असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी सांगितले होते की, नागरिक त्यांचे पैसे बँकेत 30 डिसेंबरपर्यंत आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये 21 मार्च 2017 पर्यंत जमा करू शकतील. मात्र, ते आता नागरिकांचा विश्‍वासघात का करत आहेत?' असा प्रश्‍न उपस्थित करत सूरजेवाला पुढे म्हणाले, "आजपर्यंत नोटाबंदीसंदर्भातील नियम 125 वेळा बदलले आहेत आणि नोटाबंदीमुळे 100 पेक्षा अधिक जण मृत्युमुखी पडले आहेत. अद्यापही सरकारला लाज वाटत नाही. मोदी सरकारने कामगार, गरीब आणि सामान्य नागरिकांच्या जीवनात सर्जिकल स्ट्राईक केले आहे. एका बाजूला कमर्चारी भविष्य निर्वाह निधीचे (ईपीएफ) व्याजदर 8.8 टक्‍क्‍यांवरून कमी करून 8.65 टक्के केले आहेत. तर, आता पाच हजार रुपये केवळ एकदाच जमा करण्याचे बंधन लादले आहे. आता बँकेतील अधिकारी पोलिसांप्रमाणे तुमच्याकडे विचारणा करणार असून तुम्हाला तुमच्या पैशाचा स्रोत विचारणार आहेत.'

रिझर्व्ह बँकेने नवे निर्बंध लागू केले असून त्यानुसार पाच हजारपेक्षा जास्त रकमेच्या पाचशे व एक हजारच्या जुन्या नोटा 30 डिसेंबरपर्यंत बँकेत एकदाच भरता येणार आहेत. योग्य स्पष्टीकरण न मिळाल्यास अशी रक्कम काळा पैसा समजून पंतप्रधान गरीब कल्याण योजनेत जमा केली जाणार आहे आणि 30 डिसेंबरनंतर नोटाभरणा बंद होणार आहे.

Web Title: Nation in inconvenience; government unashamed