राष्ट्रीय वाहिन्यांना प्रसारभारतीचे टाळे

पीटीआय
शनिवार, 5 जानेवारी 2019

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या मालकीची माध्यम संस्था "प्रसार भारती'ने आता "ऑल इंडिया रेडिओ'च्या राष्ट्रीय वाहिन्या आणि अन्य पाच राज्यांतील प्रादेशिक प्रशिक्षण केंद्रे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढत्या खर्चाला कात्री लावण्याबरोबरच सर्व सेवांचे एकत्रीकरण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

वाहिन्यांच्या कार्यक्रम निर्मिती, तांत्रिक, मंत्रालय आदी विभागांमध्ये काम करणारे कर्मचारी आणि तोडपूर, नागपूर आदी ठिकाणांवर नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या आवश्‍यकतेनुसार बदल्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. "ऑल इंडिया रेडिओ'च्या महासंचालकांनीच या संदर्भातील आदेश जारी केला आहे. "ऑल इंडिया रेडिओ'च्या सर्व सेवांचे एकत्रीकरण केले जाणार असून, खर्चाची बचत व्हावी म्हणून प्रसार भारतीने हा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील माहिती "ऑल इंडिया रेडिओ'च्या महासंचालकांना देण्यात आली आहे.

"ऑल इंडिया रेडिओ'चे सर्वच चॅनल बंद करण्याबरोबरच अहमदाबाद, हैदराबाद, लखनौ, शिलॉंग आणि तिरुअनंतपुरम येथील प्रसारण आणि मल्टिमीडियाच्या प्रादेशिक अकादमींनादेखील तातडीने टाळे ठोकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 24 डिसेंबर 2018 रोजीच या संदर्भातील आदेश निघाला आहे. 

विभागांत नाराजी 

या राष्ट्रीय वाहिन्यांकडे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा मोठा संग्रह असून, तो दिल्लीतील केंद्रीय विभागाकडे पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तेथे या सगळ्या साहित्य सामग्रीचे डिजिटायजेशन करण्यात येईल.

विशेष म्हणजे हे विभाग बंद केल्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांना मात्र अन्यत्र हलविण्यात येणार आहे. दरम्यान, सरकारच्या या निर्णयावर ऑल इंडिया रेडिओचेच काही विभाग नाराज असल्याचे समजते. अन्य मार्गानेही सरकारला खर्चात कपात करता आली असती, असे त्यांचे म्हणणे आहे.

Web Title: National Channels Lock from Prasar Bharati