महिलांच्या व मुलींच्या लैंगिक छळाबाबत राष्ट्रीय महिला आयोगाची कठोर भूमिका; राज्य सरकारला विशेष दिशानिर्देश जारी

महिला आयोगाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना दिशानिर्देश जारी केली आहे.
National Commission for Women Action on sexual harassment of women and girls crime delhi
National Commission for Women Action on sexual harassment of women and girls crime delhiesakal

नवी दिल्ली - महिलांच्या व मुलींच्या लैंगिक छळाबाबत राष्ट्रीय महिला आयोगाने कठोर भूमिका घेतली असून राज्य सरकारांना विशेष दिशानिर्देश जारी केले आहेत.

विशेषतः नोकरीच्या ठिकाणी, शैक्षणिक संस्थांत व कोचिंग क्लासेस मध्ये होणाऱया लैंगिक छळाच्या प्रकारांबाबत आयोग विशेष गंभीर आहे.

महिला आयोगाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना दिशानिर्देश जारी केली आहे. त्यात कोचिंग क्लास सेंटर्स व शैक्षणिक संस्थांना मुली व महिलांबरोबर होणाऱया वर्तणुकीबाबत सूचना देण्याची सूचना आयोगाने राज्य सरकारांना केली आहे.

या शैक्षणिक संस्था चालवणाऱ्यांची पार्श्वभूमी तपासण्यास महिला आयोगाने मुख्य सचिवांना सांगितले आहे. आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी ‘कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, प्रतिबंध आणि निवारण २०१३) कायद्याचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यास राज्य सरकारांना सांगितले आहे.

कोचिंग सेंटर्स त्या त्या जिल्ह्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे नोंदणीकृत आहेत की नाही याची खात्री करण्यावरही भर दिला आहे. शर्मा यांनी सांगितले की संबंधित अधिकार्‍यांनी महिलांचा लैंगिक छळ रोखण्यासाठीच्या या कायद्याबद्दल सर्व संबंधितांमध्ये जागरूकता कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश द्यावेत जेणेकरून लैंगिक छळाच्या प्रकरणांची नोंद करता येईल,

अशी विनंती आयोगाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केली आहे कोचिंग क्लासेस- शैक्षणिक केंद्रे चालवण्यास जबाबदार असलेल्या लोकांची पार्श्वभूमी तपासण्यासही राज्यांना सांगण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com