राष्ट्रीय महिला आयोग काय करतं? कशी करावी तक्रार, जाणून घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

National Commition For Women

राष्ट्रीय महिला आयोग काय करतं? कशी करावी तक्रार, जाणून घ्या

National Commition For Women : आज राष्ट्रीय महिला आयोगाचा स्थापना दिवस आहे. संसदेत पास झालेल्या अधिनियमांतर्गत या आयोगाची स्थापना ३१ जानेवारी १९९२ मध्ये करण्यात आली होती. महिला आयोग स्ठापनेपासूनच महिलांसाठी काम करत आहे. राष्ट्रीय महिला आयोगाचा उद्देश देशातील महिलांचे हक्क, त्यांच्या समस्या आणि चिंता यांना आवाज देणे आणि त्यांचे संरक्षण करणे हा आहे. यात कौटुंबिक, राजकीय, धार्मिक आणि नोकरी संदर्भात महिलांच्या मुद्द्यावर जागरुकता निर्माण करतं. हिंसा आणि बलात्कार पीडित महिलांना न्याय आणि पुनर्वसनासाठी काम करतं.

कामाचं स्वरुप

महिलांच्या संरक्षणासाठी संविधान आणि इतर कायद्यांतर्गत अनेक प्रकरणांची चौकशी करण्याचे दिवाणी न्यायालयाचे अधिकार आयोगाला देण्यात आले आहेत. आयोग महिलांसाठी संविधानिक आणि कायदेशीर संरक्षणांचा आढावा घेतो आणि सुधारात्मक विधायी उपायांची शिफारस करतो. हे महिलांना प्रभावित करणाऱ्या सर्व धोरणात्मक बाबींवर सरकारला सल्ला देते. आयोग महिलांचे आर्थिक सशक्तिकरण, लैंगिक जागरुकता, स्त्री भ्रुण हत्या आणि महिलांविरुद्ध बाबींवर जन अभियान राबवून त्यांच्या तक्रारी जाणून घेतात. हे तुरुंग, रिमांड होम, जिथे महिलांना कोठडीत ठेवले जाते, इत्यादींची तपासणी करते आणि आवश्यक तिथे कारवाई करण्याचे आवाहन करते.

महिला आयोगात तक्रार कधी करता येते?

  • कौटुंबिक हिंसाचाराबाबत महिला तक्रार करू शकते.

  • कामाच्या ठिकाणी महिलांच शोषण होत असल्यास

  • हुंडा मागणी, हुंडा बळी, बलात्कार, लैंगिक अत्याचार पीडित महिला तक्रार करू शकतात.

  • अ‍ॅसिड अ‍ॅटॅक पीडित महिला

  • कोणत्या महिलेची तक्रार पोलिस स्टेशनला केलेली असेल.

  • जर पोलिसांकडे तक्रार नोंदवून पण कारवाई होत नसेल तर.

तक्रार कशी करावी?

  • महिला आयोगात तक्रार करण्यासाठी up.mahilaayog@yahoo.com वर मेल करा.

  • व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातूनही तक्रार करता येईल. क्रमांक - ६३०६५११७०८

  • महिला आयोगात फॅक्स करून तक्रार केली जाऊ शकते. क्रमांक - ०५२२-२७२८६७१

  • ऑनलाइन अर्ज करूनही तक्रार करू शकतात. लिंक - http://ncwapps.nic.in/onlinecomplaintsv2/ ॉ

  • 'PLOT NO 21, FC33, Institutional Area, Jasola, New Delhi, Delhi 110025' या पत्त्यावर स्वतः जाऊन तक्रार नोंदवू शकतात.

  • PLOT NO 21, FC33, Institutional Area, Jasola, New Delhi, Delhi 110025 या पत्त्यावर पत्र पाठवून तक्रार करू शकतात.

  • महिला हेल्प लाइनला 1800-180-5220 या टोल फ्री नंबरवर कॉल करून.

टॅग्स :Woman