राष्ट्रीय महामार्गावरील टोलवर आता ई-पेमेंट

पीटीआय
मंगळवार, 6 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - राष्ट्रीय महामार्गावरील टोलवर क्रेडिट व डेबिट कार्ड; तसेच ई-वॉलेटद्वारे भरणा करावा, अशा सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने दिल्या आहेत. याचसोबत 15 डिसेंबरपर्यंत या टोल नाक्‍यांवर पाचशेच्या जुन्या नोटा स्वीकारण्यात येणार आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आली असल्याचे गृहमंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

सर्व राज्यांच्या प्रधान सचिवांसोबत झालेल्या संवादामध्ये गृहमंत्रालयाकडून टोलमार्गावरील ई-पेमेंटसंबंधी माहिती देण्यात आली. याचसोबत राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्‍यांवर ई-पेमेंटची उपकरणे, ई-वॉलेटसंबंधी उपकरणे, क्रेडिट-डेबिट कार्ड स्वाइप मशिन ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. याचसोबत विशेष प्रकरणांमध्ये 15 डिसेंबरपर्यंत 500 च्या जुना नोटा स्वीकारण्यात येणार असल्याचे केंद्रीय गृहसचिव दिलीप कुमार यांनी सांगितले.

Web Title: National Highway toll on the e-payment