मदरशातील सात विद्यार्थ्यांना एनआयएने घेतले ताब्यात 

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 एप्रिल 2018

एनआयएच्या दोन अधिकाऱ्यांनी एक दिवस दुपारी येऊन, येथे अरबीचे प्रशिक्षण घेत असलेल्या सात विद्यार्थ्यांना बंद खोलीत बोलावून त्यांची चौकशी केली.

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील बांदा जिल्ह्यातील अरबिया मदरशातील सात काश्मिरी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) ताब्यात घेतले आहे. मार्च महिन्यात एनआयएच्या अधिकाऱ्यांनी या मदरशातील संचालक व विद्यार्थ्यांची चौकशी केली होती. दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून या विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

एनआयएच्या दोन अधिकाऱ्यांनी एक दिवस दुपारी येऊन, येथे अरबीचे प्रशिक्षण घेत असलेल्या सात विद्यार्थ्यांना बंद खोलीत बोलावून त्यांची चौकशी केली, असे मदरशाच्या संचालकांचा भाऊ मौलाना मुफ्ती नजीब अहमद यांनी सांगितले.   

या मदरशात अरबीचे प्रशिक्षण घेत असलेल्या तौसीफ या विद्यार्थ्याबद्दल तीन महिन्यांपूर्वीच माहिती मिळाली होती, त्यानंतर या सात विद्यार्थ्यांना त्यांनी ताब्यात घेतले, अशी माहिती एनआयएकडून मिळाली आहे. पुढील गोष्टींबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे. 

तौसीफला काही दिवसांपूर्वी एनआयएने काश्मिरमध्ये अटक केली होती. या चौकशीत मदरशाचे संचालक हबीब अहमद व सात विद्यार्थ्यांनी चांगले सहकार्य केले. 

Web Title: National investigation agency arrested 7 students from madarsa in uttar pradesh