राष्ट्रीय नेमबाज महिलेवर प्रशिक्षकाचा बलात्कार

वृत्तसंस्था
रविवार, 4 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - राष्ट्रीय दर्जाच्या एका नेमबाज महिलेवर तिच्या प्रशिक्षकनेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून याबाबत पीडित महिलेनेच पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

नवी दिल्ली - राष्ट्रीय दर्जाच्या एका नेमबाज महिलेवर तिच्या प्रशिक्षकनेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून याबाबत पीडित महिलेनेच पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

सरावाच्या निमित्ताने गेल्या दोन वर्षांपासून पीडित महिला तिच्या प्रशिक्षकाला ओळखत होती. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी या प्रशिक्षकाने तिला मार्गदर्शन केले होते. त्यामुळे दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. प्रशिक्षकाने पीडित महिलेला लग्नाचे आश्‍वासनही दिले होते. तिच्या वाढदिवसानिमित्त चाणक्‍यपुरी येथील निवासस्थानी प्रशिक्षक आला होता. यावेळी त्याने तिला शीतपेये घेण्याचा आग्रह केला. त्याने शीतपेयामध्ये नशा आणणारे पदार्थ मिसळले. त्यानंतर नशा चढल्यानंतर प्रशिक्षकाने तिच्यावर बलात्कार केला. नंतर ज्यावेळी दोघेही सराव करण्यासाठी भेटले. त्यावेळी प्रशिक्षकाने लग्नाचे आश्‍वासन दिल्याचे अमान्य केले. तिने विरोध केल्यानंतर तिला ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडित महिलेने चाणक्‍यनगर पोलिसांकडे तक्रार केली आहे. पीडित महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले असून तिच्यावर बलात्कार झाला आहे की नाही हे अद्याप सिद्ध झालेले नाही. महिलेच्या तक्रारीनुसार प्रशिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: National-level shooter accuses coash of rape