मोदींना हरविण्यासाठी चेहऱ्याची गरज नाही : अरुण शौरी 

वृत्तसंस्था
शनिवार, 24 मार्च 2018

शौरी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, ""केंद्र सरकारच्या विरोधात महाआघाडी तयार करताना कोणत्याही चेहऱ्याची गरज नाही. इंदिरा गांधी यांच्या विरोधातही कोणताही चेहरा त्या काळात नव्हता.'' शौरी यांनी आपला मुद्दा स्पष्ट करताना गलिवर आणि लिलीपुट यांचे उदाहरणही दिले.

नवी दिल्ली  : "माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची संपूर्ण देशात लाट असताना 1977मध्ये त्यांना हरवण्यासाठी कोणताच चेहरा नव्हता. लोकांनीच त्यांना पराभूत केले होते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही हरवण्यासाठी चेहऱ्याची गरज नाही,'' असा घरचा आहेर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अरुण शौरी यांनी आज दिला.

मात्र त्याच वेळी विरोधकांनी एकत्र येऊन तिसरी आघाडी तयार करण्याची ही योग्य वेळ नसल्याचेही त्यांनी सांगितले. 

शौरी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, ""केंद्र सरकारच्या विरोधात महाआघाडी तयार करताना कोणत्याही चेहऱ्याची गरज नाही. इंदिरा गांधी यांच्या विरोधातही कोणताही चेहरा त्या काळात नव्हता.'' शौरी यांनी आपला मुद्दा स्पष्ट करताना गलिवर आणि लिलीपुट यांचे उदाहरणही दिले.

कोणत्याही राजकीय पक्षाच्या तुलनेत राजकारण मोठे असते, असेही त्यांनी सांगितले. 
बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष 25 वर्षांनी एकत्र आल्याने उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला. त्याबद्दल विचारले असताना शौरी म्हणाले, ""विरोधी पक्षांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे. विरोधकांना एकत्र आणण्याचे काम पंतप्रधान मोदीच करत आहेत. कारण त्यांनी प्रत्येक पक्षाला नष्ट करण्याची भाषा केली आहे. त्यामुळे एकत्र न आल्यास सगळे विरोधी पक्ष संपून जातील. भाजपच्या सहकारी पक्षांनाही स्वतःचे अस्तित्व नष्ट होण्याचा धोका जाणवतो आहे.''

Web Title: National news Arun Shourie criticize Narendra Modi