बीफ फेस्टिव्हलवरून विद्यार्थ्याला मारहाण

वृत्तसंस्था
बुधवार, 31 मे 2017

आंबेडकर पेरियार स्टडी सर्कल (एपीएससी) संबंधित हा विद्यार्थी असून, त्याच्यावर मंगळवारी हल्ला करण्यात आला. आर. सुरज असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. मद्रास आयआयटीमध्ये तो डिपार्टमेंट ऑफ एरोस्पेसमध्ये पीएचडीचे शिक्षण घेत आहे.

चेन्नई - मद्रास आयआयटीमध्ये बीफ फेस्टिव्हल आयोजित केल्यामुळे उजव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांकडून एका पीएचडीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आली. 

आंबेडकर पेरियार स्टडी सर्कल (एपीएससी) संबंधित हा विद्यार्थी असून, त्याच्यावर मंगळवारी हल्ला करण्यात आला. आर. सुरज असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. मद्रास आयआयटीमध्ये तो डिपार्टमेंट ऑफ एरोस्पेसमध्ये पीएचडीचे शिक्षण घेत आहे. त्याच्या डोळ्याला जखम झाली असून, रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास मित्रांसोबत जेवण करण्यासाठी जात असताना त्याच्यावर उजव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांकडून हल्ला करण्यात आला. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या मनीष व त्याच्या सहकाऱ्यांनी त्याच्यावर हल्ला केला. केंद्राच्या निर्णयाला विरोध म्हणून मद्रास आयआयटीमध्ये 28 मे रोजी बीफ फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. या फेस्टिव्हलमध्ये सुरजसह अन्य दोन विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला होता.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :
दिल्ली आयआयटीतील विद्यार्थीनीची आत्महत्या

जनावरे विक्री बंदीबाबत दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सूट शक्‍य
शेतकरी संपावर काहीही साध्य होणार नाही : माधव भंडारी
दीड पायाच्या ‘लक्ष्मी’ची झेप
#स्पर्धापरीक्षा - बलुचिस्तान
शहरांच्या जागतिक क्रमवारीत पुणे तेरावे

Web Title: national news Beef fest: IIT-M scholar attacked by right-wing students