'मणिकर्णिका' चित्रपटाला ब्राह्मण महासभेचा विरोध

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

राजस्थानमध्ये सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे. 'मणिकर्णिका' या चित्रपटात राणी लक्ष्मीबाई आणि एका इंग्रज अधिकाऱ्यामध्ये प्रेम प्रसंगाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. याला ब्राह्मण महासंघाने विरोध केला आहे. चित्रपटाचे निर्माते कमल जैन यांना पत्रही पाठविण्यात आले आहे.

जयपूर - पद्मावत चित्रपटाच्या विरोधानंतर आता झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित 'मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटाला ब्राह्मण महासभेकडून विरोध करण्यात येत आहे.

पद्मावत चित्रपटात ऐतिहासिक घडामोडींशी छेडछाड करण्यात आल्याचा आरोप केला होता. आता 'मणिकर्णिका' चित्रपटाला विरोध करत चित्रपटाचे चित्रीकरण रोखण्याची धमकी दिली आहे. सरकारने या चित्रपटाचे चित्रीकरण थांबवावे, अन्यथा आम्ही रोखू असे ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष सुरेश मिश्रा यांनी म्हटले आहे.

राजस्थानमध्ये सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे. 'मणिकर्णिका' या चित्रपटात राणी लक्ष्मीबाई आणि एका इंग्रज अधिकाऱ्यामध्ये प्रेम प्रसंगाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. याला ब्राह्मण महासंघाने विरोध केला आहे. चित्रपटाचे निर्माते कमल जैन यांना पत्रही पाठविण्यात आले आहे. मात्र, या पत्राला अद्याप उत्तर न मिळाल्याने चित्रीकरण रोखण्याची धमकी देण्यात आली आहे.
 

Web Title: national news Brahmin outfit threatens stir against Kangana Ranaut Manikarnika