'नमामि गंगे'चा निधी वापराविना पडून 

CAG to submit reports on Namami Gange
CAG to submit reports on Namami Gange

नवी दिल्ली : केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या "नमामि गंगे'च्या अंमलबजावणीबाबत खुद्द सरकारच उदासीन असल्याचे दिसून येते. सरकारने गाजावाजा करत सुरू केलेल्या या प्रकल्पासाठी मोठ्या निधीची तरतूद केली असली, तरीसुद्धा तो खर्च करण्याबाबत मात्र आपला हात आखडता घेतल्याचे ताशेरे "कॅग'ने (महालेखापाल) ओढले आहेत. या योजनेचा 2014 ते 15 आणि 2016 ते 17 या काळामध्ये केवळ 8 ते 63 टक्‍क्‍यांपर्यंतचाच निधी खर्च झाला आहे. 

राष्ट्रीय गंगा शुद्धीकरण मोहिमेअंतर्गतचा (एनएमसीजे) अनुक्रमे 2,133.76 कोटी, 422.13 कोटी आणि 59.28 कोटी रुपयांचा निधी तसाच सरकारच्या तिजोरीमध्ये पडून आहे. याबाबत निरीक्षण नोंदविताना महालेखापालांनी म्हटले आहे, ""राष्ट्रीय गंगा शुद्धीकरण मोहिमेअंतर्गत निधी अवलोकन समितीची स्थापना करण्यात आलेली नाही. ही समिती नसल्यामुळे निधी खर्चाचा आढावा घेणे शक्‍य होत नाही. केवळ यामुळे 2014 ते 15 आणि 2016 ते 17 या काळात सुधारित अंदाज आणि प्रत्यक्ष खर्च यामध्ये मोठी तफावत दिसून येते.'' 

अन्य शिफारशी 
गंगापात्रातील अतिक्रमण आणि बेकायदा बांधकामांना लगाम घालण्यासाठी गंगा संवर्धन क्षेत्र निश्‍चित करणे आवश्‍यक आहे. गंगा खोरे व्यवस्थापन आराखड्याची निर्मिती करणेही सहज शक्‍य असून, तो गंगा पुनरुज्जीवनाच्या प्रक्रियेतील दीर्घकालीन हस्तक्षेप ठरू शकतो, असे "कॅग'ने म्हटले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com