दोषींवर कडक कारवाई करू; आदित्यनाथ यांनी मौन सोडले

वृत्तसंस्था
बुधवार, 31 जानेवारी 2018

केंद्राने अहवाल मागवला 
नवी दिल्ली : कासगंज जातीय हिंसाचारप्रकरणी केंद्र सरकारने उत्तर प्रदेश सरकारकडे अहवाल मागवला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने गेल्या शुक्रवारी प्रजासत्ताकदिनी घडलेल्या या हिंसाचाराच्या घटनेबाबत उत्तर प्रदेश सरकारला सविस्तर अहवाल देण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर कासगंज आणि अन्य ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्यासाठी आवशय्क ती पावले उचलण्यास सांगितले आहे. त्याची माहिती केंद्राला देण्यास बजावण्यात आले आहे. 
 
लखनौ : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कासगंज हिंसाचाराबाबतचे मौन सोडले असून, यातील दोषींवर ती राजकीय व्यक्ती असली तरी कडक कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन दिले आहे. या हिंसाचारात ठार झालेला तरुण अल्पसंख्याक समाजातील असता तर प्रसिद्धी माध्यमांनी वेगळी भूमिका घेतली असती, असे वादग्रस्त विधान केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी केले आहे, तर भाजप नेते विनय कटियार यांनी, या हिंसाचारामागे पाकिस्तानला पाठिंबा देणारी दुष्ट प्रवृत्ती असल्याचे म्हटले आहे. 

या पार्श्‍वभूमीवर आदित्यनाथ यांनी, कारवाईचा इशारा देत; आमचे सरकार राज्यातील प्रत्येक नागरिकाला संरक्षण पुरवण्यास कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले आहे. 
"हा हिंसाचार पूर्वनियोजित होता. यात चेतन गुप्ता ऐवजी महंमद इस्माइलही ठार झाला असता तर माध्यमांनी वेगळी भूमिका घेतली असती,'' असे विधान गिरिराज सिंह यांनी केले होते. त्याचबरोबर जिल्हा न्यायदंडाधिकारी राघवेंद्र विक्रमसिंह यांच्या फेसबुकवरील, उजव्या विचारसरणीच्या संघटनांमुळे हिंसाचार झाल्याच्या टिप्पणीबाबत ते म्हणाले, ""काही जण "पाकिस्तान मुर्दाबाद'च्या घोषणा का देतात, याबाबत कोणीतरी नोकरशहाने काय टिप्पणी केली, हे मला जाणून घ्यायचे आहे.

पाकिस्तानने आपल्या जवानांना मारले, अशी घोषणा आपण केली पाहिजे आणि सीमा भागात दहशतवाद घडवण्यात त्यांचा सहभाग असल्याचे म्हटले पाहिजे.'' 

दरम्यान, असा हिंसाचार पुन्हा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा देत, पोलिस महासंचालक ओ. पी. सिंग यांनी, या हिंसाचारामागे आणि चंदनच्या मृत्यूमागे असलेल्यांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये कारवाई केली जाईल. आतापर्यंत शंभर जणांना वेगवेगळ्या गुन्ह्यांखाली तुरुंगात पाठविल्याचे सांगितले. 

केंद्राने अहवाल मागवला 
नवी दिल्ली : कासगंज जातीय हिंसाचारप्रकरणी केंद्र सरकारने उत्तर प्रदेश सरकारकडे अहवाल मागवला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने गेल्या शुक्रवारी प्रजासत्ताकदिनी घडलेल्या या हिंसाचाराच्या घटनेबाबत उत्तर प्रदेश सरकारला सविस्तर अहवाल देण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर कासगंज आणि अन्य ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्यासाठी आवशय्क ती पावले उचलण्यास सांगितले आहे. त्याची माहिती केंद्राला देण्यास बजावण्यात आले आहे.
 
Web Title: national news Centre Seeks Report Yogi Adityanath On Kasganj Violence