राजस्थानच्या विधिमंडळात भुताचा वावर 

वृत्तसंस्था
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018

अशीही साडेसाती 
मागील वर्षी मंडलगडच्या भाजप आमदार कीर्ती कुमारी यांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला होता, तर "बसप'चे आमदार बी. एल. कुशवाह यांनाही खूनप्रकरणी तुरुंगात जावे लागले. मागील विधानसभेतील कॉंग्रेस आमदार महिपाल मदेरणा, मल्खानसिंह बिष्णोई आणि बाबूलाल नागर यांना बलात्कार आणि खूनप्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. हे सगळे काही वाईट आत्म्यांमुळे झाल्याचे आमदारांचे म्हणणे आहे.

जयपूर : विज्ञान तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली तरीसुद्धा माणसाच्या मनातील भुताची सुप्त भीती काही केल्या दूर होत नाही. सामान्य माणसांप्रमाणेच राजकीय नेतेही याला अपवाद नसतात. बिहारमध्ये तेजप्रताप यादव यांनी भुताच्या भीतीने शासकीय निवासस्थान सोडल्याची घटना ताजी असतानाच आता राजस्थानातील आमदारांनी विधिमंडळालाच भुताने पछाडल्याचा दावा केला आहे. 

या विधिमंडळाची सदस्य संख्या 200 एवढी असून, ती कधीच कायम राहत नाही, एखादा सदस्य राजीनामा देतो, कोणी तुरुंगात जाते किंवा एखाद्याचे अकाली निधन होते. या सर्वांमागे वाईट आत्म्याचा हात असल्याचे आमदारांचे म्हणणे असून, त्यांनी मुख्यमंत्री वसुंधराराजेंकडे तशी तक्रारदेखील केली आहे. या वाईट आत्म्याला पळवून लावण्यासाठी सभागृहामध्ये यज्ञयाग केला जावा, अशी विनंतीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. गुरुवारी तर काही आमदारांनी तांत्रिकास आणून विधिमंडळाच्या प्रवेशद्वाराजवळ पूजा केल्याचे उघड झाले आहे. मध्यंतरी भाजप आमदाराच्या अकाली निधनामुळे सर्वच आमदारांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. 

अशीही साडेसाती 
मागील वर्षी मंडलगडच्या भाजप आमदार कीर्ती कुमारी यांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला होता, तर "बसप'चे आमदार बी. एल. कुशवाह यांनाही खूनप्रकरणी तुरुंगात जावे लागले. मागील विधानसभेतील कॉंग्रेस आमदार महिपाल मदेरणा, मल्खानसिंह बिष्णोई आणि बाबूलाल नागर यांना बलात्कार आणि खूनप्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. हे सगळे काही वाईट आत्म्यांमुळे झाल्याचे आमदारांचे म्हणणे आहे. 

ज्या जागेवर विधिमंडळाची नवी इमारत उभारण्यात आली आहे ती कधीकाळी स्मशानभूमी होती. अशा ठिकाणांवर नेहमीच भुताखेतांचे वास्तव्य असते. 
- हबीबूर रहेमान, भाजप आमदार

Web Title: National news Ghost in Rajasthan Assembly