गोव्यातील खाणी सुरू ठेवण्यासाठी दिल्लीत प्रयत्न

अवित बगळे
सोमवार, 5 मार्च 2018

सर्वोच्च न्यायालयाने गोव्यातील खाणपट्ट्यांचे नूतनीकरण अवैध ठरवत १५ मार्चनंतर खाणकाम बंद करण्याचा आदेश दिला आहे. खाणकाम बंद झाल्यास दीड लाख जण बेरोजगार होतील अशी भीती व्यक्त करत राज्यसरकारने केंद्र सरकारकडे वटहुकूम काढण्याची मागणी करण्याचे ठरविले आहे.

पणजी (गोवा): गोव्यातील खाणी १५ मार्चनंतर सुरु ठेवाव्यात यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने आज दिल्लीत केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन सादर केले.

सर्वोच्च न्यायालयाने गोव्यातील खाणपट्ट्यांचे नूतनीकरण अवैध ठरवत १५ मार्चनंतर खाणकाम बंद करण्याचा आदेश दिला आहे. खाणकाम बंद झाल्यास दीड लाख जण बेरोजगार होतील अशी भीती व्यक्त करत राज्यसरकारने केंद्र सरकारकडे वटहुकूम काढण्याची मागणी करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीत पाठवण्यात आले आहे. या शिष्टमंडळाने आज गडकरी यांची भेट घेतली.

शिष्टमंडळाचा केंद्रीय खाणमंत्री नरेंद्रसिंह तोमर व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेण्याचा प्रयत्न आहे.

Web Title: national news goa mining issue