हार्दिकने दिली नितीन पटेलांना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर

वृत्तसंस्था
शनिवार, 30 डिसेंबर 2017

नितीन पटेल यांच्याबाबत अन्याय झाला आहे. योग्य ते खाते न मिळाल्याने ते नाराज आहेत. ते काँग्रेसमध्ये आले तर त्यांचा योग्य सन्मान केला जाईल. नितिनभाईंना माझी विनंती आहे, की त्यांनी आमच्यासोबत येऊन अहंकाराविरोधात लढाई लढली पाहिजे.

अहमदाबाद - खाते वाटपामुळे नाराज असलेले गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांना पाटीदार नेते हार्दिक पटेलने काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली आहे.

गुजरातमध्ये भाजपमध्ये सहाव्यांदा सत्ता स्थापन केली असून, नितीन पटेल यांना पुन्हा उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले आहे. नितीन पटेल यांना देण्यात आलेल्या खात्यांवरून ते नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना आतापर्यंत मंत्रालयाचा पदभार स्वीकारलेला नाही. नितीन पटेल यांच्या नाराजीवरून हार्दिक पटेलने वक्तव्य केले आहे.

हार्दिक म्हणाला, की नितीन पटेल यांच्याबाबत अन्याय झाला आहे. योग्य ते खाते न मिळाल्याने ते नाराज आहेत. ते काँग्रेसमध्ये आले तर त्यांचा योग्य सन्मान केला जाईल. नितिनभाईंना माझी विनंती आहे, की त्यांनी आमच्यासोबत येऊन अहंकाराविरोधात लढाई लढली पाहिजे.

Web Title: National news Hardik Patel offer to Gujarat deputy cm Nitin Patel