दिल्ली आयआयटीतील विद्यार्थीनीची आत्महत्या

वृत्तसंस्था
बुधवार, 31 मे 2017

आयआयटी दिल्लीत दोन महिन्यांपूर्वीच एका विद्यार्थ्याने गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - दिल्ली आयआयटीत पीएचडीचे शिक्षण घेत असलेल्या 27 वर्षीय विद्यार्थीनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

पोलिस अधिकारी चिन्मय बिस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंजुला देवक (वय 27) हि विवाहीत विद्यार्थीनी पीएचडीच्या अखेरच्या वर्षाचे शिक्षण घेत होती. मंगळवारी रात्री तिच्या हॉस्टेलच्या रुममध्ये पंख्याला दोरी अडकवून तिने गळफास घेतला. आयआयटीच्या कॅम्पसमध्येच नालंदा अपार्टमेंट हे हॉस्टेल आहे. या हॉस्टेलच्या 413 नंबरच्या रुममध्ये ती राहत होती. नालंदा अपार्टमेंटमध्ये फक्त विवाहीत विद्यार्थीनींनाच रुम दिल्या जातात. या आत्महत्येमागील अद्याप काही कारण समजू शकलेले नाही, तसेच चिठ्ठीही मिळालेली नाही. तपास करण्यात येत आहे.

आयआयटी दिल्लीत दोन महिन्यांपूर्वीच एका विद्यार्थ्याने गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मंजुला हिचे पती आणि कुटुंबीय भोपाळमध्ये राहतात.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :
जनावरे विक्री बंदीबाबत दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सूट शक्‍य
शेतकरी संपावर काहीही साध्य होणार नाही : माधव भंडारी
दीड पायाच्या ‘लक्ष्मी’ची झेप
#स्पर्धापरीक्षा - बलुचिस्तान
शहरांच्या जागतिक क्रमवारीत पुणे तेरावे

Web Title: national news IIT-Delhi PhD student found dead in hostel