काश्मीर: सीआरपीएफच्या कॅम्पवर हल्ला करणारे 4 दहशतवादी ठार

वृत्तसंस्था
सोमवार, 5 जून 2017

बंदिपुरा जिल्ह्यातील सुंबल येथे 45 बटालियन सीआरपीएफचा कॅम्प आहे. दहशतवाद्यांनी आज पहाटे चारच्या सुमारास कॅम्पवर जोरदार गोळीबार करत हल्ला केला. या गोळीबाराला सुरक्षा रक्षकांनी चोख प्रत्युत्तर देत हल्ला करणाऱ्या चारही दहशतवाद्यांचा खात्मा केला.

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील बंदिपुरा जिल्ह्यातील केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) कॅम्पवर हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांना ठार मारण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले आहे. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.

बंदिपुरा जिल्ह्यातील सुंबल येथे 45 बटालियन सीआरपीएफचा कॅम्प आहे. दहशतवाद्यांनी आज पहाटे चारच्या सुमारास कॅम्पवर जोरदार गोळीबार करत हल्ला केला. या गोळीबाराला सुरक्षा रक्षकांनी चोख प्रत्युत्तर देत हल्ला करणाऱ्या चारही दहशतवाद्यांचा खात्मा केला. सीआरपीएफचे जवान आणि काश्मीर पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. या चकमकीत एकही जवान जखमी झालेला नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांचा कॅम्पमध्ये आत्मघाती हल्ला करण्याचा प्रय़त्न होता. मात्र, तो सुरक्षा रक्षकांनी उधळून लावला. दहशतवाद्यांकडून 4 एके 47 रायफल्स, ग्रेनेड लॉन्चर आणि अन्य काही स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. दहशतवादी हल्ला करताना पेट्रोलही घेऊन आले होते. कॅम्प पेटवून देण्याच्या उद्देशाने ते आले असल्याचे सांगण्यात येत आहे. 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
महाराष्ट्र 'बंद' यशस्वी करण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार
#स्पर्धापरीक्षा - भारताची संपूर्ण स्वदेशी उपग्रह यंत्रणा 'नाविक'​
भारताचा पाकवर 124 धावांनी दणदणीत विजय​
'दानवेंच्या शेतकऱ्यांसंदर्भातील वक्तव्याचा तपास करा'
मॉन्सूनचे महाराष्ट्रात गुरुवारी आगमन​
मुंबईत भाज्यांच्या किमती भडकल्या

Web Title: national news J-K: Four militants killed by CRPF, J-K Police