कांची पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वतींचे निधन

वृत्तसंस्था
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

जयेंद्र सरस्वती यांचा जन्म 18 जुलै 1935 मध्ये झाला होता. दक्षिण भारतात त्यांचे मोठ्या प्रमाणात अनुयायी होते. या पीठाकडून शाळा, रुग्णालये चालविली जातात. चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामीगल यांच्यानंतर जयेंद्र सरस्वती यांना या पीठाचे शंकराचार्य म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

चेन्नई - कांची पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती (वय 82) यांचे आज (बुधवार) सकाळी दीर्घ आजारपणाने निधन झाले.

तमिळनाडूतील कांचीपुरम येथे आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्वासोश्वास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या वर्षभरापासून ते आजारी होते. आठव्या शतकात शंकराचार्यांनी कांची पीठाची सुरवात केली होती. जयेंद्र सरस्वती हे या पीठाचे 69 वे शंकराचार्य होते.

जयेंद्र सरस्वती यांचा जन्म 18 जुलै 1935 मध्ये झाला होता. दक्षिण भारतात त्यांचे मोठ्या प्रमाणात अनुयायी होते. या पीठाकडून शाळा, रुग्णालये चालविली जातात. चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामीगल यांच्यानंतर जयेंद्र सरस्वती यांना या पीठाचे शंकराचार्य म्हणून नियुक्त करण्यात आले होते. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

Web Title: national news Kanchi Shankaracharya Jayendra Saraswathi Dies At 82