अभिनेत्री तमन्ना भाटियावर चप्पलफेक 

वृत्तसंस्था
सोमवार, 29 जानेवारी 2018

करीमुल्लाह (31) असे चप्पल फेकणाऱ्याचे नाव असून, तो जैवतंत्रज्ञान विषयातील पदवीधर आहे. तो मूळचा मुर्शीदाबाद येथील आहे. करीमुल्लाह हा उद्‌घाटन झालेल्या ज्वेलरी स्टोअरचा कर्मचारी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटात तमन्नानाची भूमिका न आवडल्याने निराश होऊन चप्पल फेकल्याचे आरोपीने सांगितले.

हैदराबाद : सिनेअभिनेत्री तमन्ना भाटिया हिच्यावर हिमायतनगर येथे एका कार्यक्रमात चप्पल फेकण्यात आली. चप्पल फेकणाऱ्यास ताब्यात घेण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Man hurls shoe at actress Tamanna in Hyderabad

तमन्ना एका दागिन्यांच्या दुकानाचे उद्‌घाटन करत असताना ही घटना घडली. चप्पल किंचित बाजूने गेल्याने तमन्ना थोडक्‍यात बचावली. 

करीमुल्लाह (31) असे चप्पल फेकणाऱ्याचे नाव असून, तो जैवतंत्रज्ञान विषयातील पदवीधर आहे. तो मूळचा मुर्शीदाबाद येथील आहे. करीमुल्लाह हा उद्‌घाटन झालेल्या ज्वेलरी स्टोअरचा कर्मचारी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटात तमन्नानाची भूमिका न आवडल्याने निराश होऊन चप्पल फेकल्याचे आरोपीने सांगितले. करीममुल्लाह याची पोलिस चौकशी करत आहेत. ब्लॉकबस्टर चित्रपट बाहुबली द बिगनिंग व बाहुबली 2 : द कन्क्‍ल्युजन या दोन्ही चित्रपटांमध्ये तमन्नाची प्रमुख भूमिका होती. 

Web Title: national news Man hurls shoe at actress Tamanna in Hyderabad