नागालँडमध्ये भाजप सर्वांत मोठा पक्ष

वृत्तसंस्था
शनिवार, 3 मार्च 2018

नागालॅंड या ईशान्य राज्यांमध्ये मंगळवारी विधानसभेच्या जागांसाठी मतदान झाले होते. नागालँडमध्ये 60 सदस्यांचे सभागृह आहे. मात्र, 59 मतदारसंघांसाठी मतदान झाले होते.

कोहिमा : नागालँडमध्ये भाजप सर्वांत मोठा पक्ष म्हणून समोर आला असून, आतापर्यंत भाजपने 29 जागांवर आघाडी घेतली आहे. नागा पीपल्स फ्रंटनेही 26 जागांवर आघाडी घेत चांगली लढत दिली. 

नागालॅंड या ईशान्य राज्यांमध्ये मंगळवारी विधानसभेच्या जागांसाठी मतदान झाले होते. नागालँडमध्ये 60 सदस्यांचे सभागृह आहे. मात्र, 59 मतदारसंघांसाठी मतदान झाले होते. नागालॅंडमध्ये एनडीपीपीचे प्रमुख नीफियू रियो यांना उत्तरी अंगामी द्वितीय विधानसभा मतदार संघातून बिनविरोध विजयी घोषीत करण्यात आले आहे.

आसाम, मणिपूर आणि अरूणाचल प्रदेशमध्ये सरकार स्थापन झाल्यामुळे उत्साहित झालेला भाजप ईशान्येत आपला पक्षविस्तार करण्याच्या प्रयत्नात आहे. यात त्यांना नागालँडमध्ये यश आले आहे. नागालॅंडमध्ये भाजप नीफियू रियो यांच्या नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पक्षाच्या साथीने सत्ता स्थापनेच्या जवळ पोचले आहे.

Web Title: National news Nagaland assembly election BJP major party