2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट: राष्ट्रपती कोविंद

Ramnath Kovind
Ramnath Kovind

नवी दिल्ली - केंद्र सरकारचे एकमेव उद्दिष्ट हे समाजाचे सशक्तीकरण करणे हेच असून, विकास हा प्रत्येक नागरिकापर्यंत पोचला पाहिजे. 2022 पर्यंत शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याचे सरकारचे लक्ष्य असल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितले.

National news president Ramnath Kovind speech in budget session

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून (सोमवार) सुरवात झाली. राष्ट्रपती कोविंद यांच्या अभिभाषणाने अधिवेशन सुरु झाले. या भाषणात त्यांनी सरकारच्या विविध योजनांविषयी माहिती दिली. तसेच सरकारच्या भविष्यातील उद्दीष्टांविषयीही माहिती दिली. 

राष्ट्रपती म्हणाले, ''देशभरात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात काम केले जात आहे. 2014 मध्ये फक्त 56 टक्के गावेच रस्त्याने जोडली होती. आता हा आकडा 82 टक्क्यांवर गेला आहे. जन धन योजनेमुळे गरिब नागरिकांना बँक खाती उघडण्यास मदत झाली आहे. आतापर्यंत तब्बल 31 कोटी नागरिकांनी बँक खाती उघडली आहेत. महिलांचे बँक खाते उघडण्याचे प्रमाण 28 टक्क्यांवरून 40 टक्क्यांवर गेले आहे. भ्रष्टाचार नष्ट करण्याच्या प्रक्रियेत सरकार आग्रही असून, सुमारे 35 हजार संशयास्पद कंपन्यांचे मान्यता रद्द करण्यात आली आहे. देशभरात 2.70 लाख कॉमन सर्व्हिस सेंटर उघडण्यात आली आहेत. या सेंटरवर डीजिटल सर्व्हिस उपलब्ध करून देण्यात आली आहेत. महिलांना 26 आठवड्यांची प्रसुती रजा देण्यात आली आहे. आधारच्या माध्यमातून गरिबांपर्यंत सरकारी योजना पोहचल्या जात आहेत.''

मुस्लिम महिलांच्या संरक्षणासाठी आणण्यात आलेल्या तिहेरी तलाक विरोधी विधेयक कौतुकास्पद, मुस्लिम महिलांच्या हितासाठी हे विधेयक आहे. मेहरमशिवाय महिला आता हज यात्रेसाठी जाऊ शकतात, यंदा 1300 पेक्षा जास्त महिला मेहरमशिवाय जाऊ शकल्या आहेत, असे राष्ट्रपतींना भाषणात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com