'ए मॉडर्न इन्टरप्रिटेशन ऑफ लोकमान्य टिलक्‍स्‌ गीतारहस्य' पुस्तकाचे प्रकाशन

Lokmanya Tilak book
Lokmanya Tilak book

पुणे : लोकमान्य टिळक यांनी "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळणारच' ही सिंहगर्जना करून सामान्यांच्या मनातील असंतोष जागा केला. या घोषणेला यंदा 101 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने उत्तर प्रदेश सरकारने आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात "सकाळ प्रकाशन' प्रकाशित आणि लेखक अरुण तिवारी लिखित, "ए मॉडर्न इन्टरप्रिटेशन ऑफ लोकमान्य टिलक्‍स्‌ गीतारहस्य' या पुस्तकाचे प्रकाशन झाले. 

उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, डॉ. दिनेश शर्मा, संसदीय कार्यमंत्री सुरेश कुमार खन्ना, महिला व बाल कल्याणमंत्री रिटा बहुगुणा जोशी, युवक कल्याण राज्यमंत्री डॉ. नीलकंठ तिवारी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह स्वातंत्र्यसैनिकांचे वंशज तसेच लोकमान्यांचे पणतू शैलेश टिळक आणि पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक उपस्थित होते.

लखनौ येथील लोकभवनात शनिवारी (ता. 30) सकाळी 11 वाजता आयोजित कार्यक्रमात या पुस्तकाचे प्रकाशन नाईक यांच्या हस्ते झाले. सांस्कृतिक संबंध वृद्धिंगत व्हावेत, या उद्देशाने उत्तर प्रदेश व महाराष्ट्र सरकारमध्ये सामंजस्य करारही होणार आहे. स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिलेले मंगल पांडे, तात्या टोपे, बहादूर शाह जफर, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, अशफाक उल्ला खान, चंद्रशेखर आझाद, ठाकूर रोशन सिंह, रामकृष्ण खत्री, शचिंद्रनाथ बक्षी, दीनदयाळ उपाध्याय, उधमसिंह, महावीर सिंह, चापेकर बंधू, विष्णू पिंगळे, एस. आर. राणा, ठाकूर दुर्गा सिंह, राघव, सरयुशरण यांच्या वंशजांनाही याप्रसंगी सन्मानित करण्यात आले.

महापौर टिळक म्हणाल्या, "लोकमान्य टिळकांनी लखनौमध्ये "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे', ही घोषणा केली. त्याच शहरात हा ऐतिहासिक कार्यक्रम झाला. शाळा, महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनाही उत्तर प्रदेश सरकारने या कार्यक्रमासाठी सहभागी करून घेतले. त्यामुळे लोकमान्यांचे कार्य जनमानसात निश्‍चितच पोचेल, असा मला विश्‍वास आहे. महाराष्ट्राबाहेर लोकमान्यांच्या कार्याचा गौरव होतोय, हे कौतुकास्पद असून, उत्तर प्रदेश सरकारचे मी मनापासून आभार मानते.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com