भागवतांसोबत स्त्रिया का नसतात?: राहुल गांधी

Rahul Gandhi
Rahul Gandhi

शिलॉंग (मेघालय) : ईशान्य भारतीय राज्यांमध्ये भाजप आणि संघपरिवार स्थानिकांची संस्कृती, भाषा आणि राहणीमान यांना दाबण्याचा प्रयत्न करत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा महिला सक्षमीकरणाचा पुरस्कार करत नाही. तुम्ही संघामध्ये महिलांना कधी उच्च पदावर पाहिले आहे का? महात्मा गांधी यांची प्रतिमा पाहिल्यास तुम्हाला त्यांच्या डाव्या आणि उजव्या बाजूला महिला दिसतील; पण सरसंघचालक मोहन भागवत हे एकटे तरी असतात किंवा त्यांच्याभोवती पुरुषांचा तरी गराडा असतो, अशी खोचक टीका कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज येथे एका कार्यक्रमात बोलताना केली. 

मेघालयमध्ये 27 फेब्रुवारीला विधानसभेसाठी मतदान होणार असल्याने कॉंग्रेसने आतापासून प्रचार सभांना वेग दिला आहे. आज येथील एका कार्यक्रमात राहुल यांनी थेट संघावरच हल्लाबोल केला. राहुल म्हणाले, ""आम्ही देशभर संघाविरोधात लढत आहोत. ते एका व्यक्तीचे विचार देशावर लादू पाहत आहेत. तिकीटवाटपाच्या प्रक्रियेमध्येही आम्ही महिला आणि पुरुष यांच्यात समानता आणू पाहत आहोत. मेघालयमधील महिलांनी कॉंग्रेससोबत यावे, यामुळे उमेदवारी देताना आमच्यासमोर अनेक पर्याय राहतील. वस्तू व सेवाकराबाबत (जीएसटी) कॉंग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. गरिबांच्या वापरातील वस्तूंवर हा कर लावला जाऊ नये.'' 

जॅकेटवरून वादंग 
शिलॉंगमध्ये मंगळवारी कॉंग्रेसच्या वतीने आयोजित एका संगीत कार्यक्रमास पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी काळ्या रंगाचे जॅकेट आणि जीन्स घालून उपस्थित होते. राहुल यांच्या जॅकेटची किंमत 64 हजार रुपये असल्याचा आरोप मेघालय भाजपने केला आहे. भाजपच्या या टीकेचे सोशल मीडियामध्येही पडसाद उमटले होते. दरम्यान, मागील पंधरा वर्षांपासून मेघालयमध्ये कॉंग्रेसचे सरकार आहे; पण या वेळेस भाजपकडून कडवे आव्हान निर्माण झाल्याने राहुल यांना मैदानात उतरावे लागले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com