मोदी यष्टीरक्षकाकडे पाहून फलंदाजी करतात: राहुल गांधी

वृत्तसंस्था
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

आमचे पंतप्रधान असे क्रिकेटर आहेत जे विकेटकिपरकडे पाहतात आणि त्यांना हेही माहीत नसते की चेंडू कुठून येत आहे. मोदी भविष्याविषयी बोलण्याऐवजी भूतकाळावरच बोलत आहेत. त्यांचा कार्यकाळ संपण्यास आता जास्त वेळ राहिला नसून, त्यांनी फक्त भाषणबाजी बंद करून काम करावे.

सिंदानूर : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खोचक टिप्पणी करताना म्हटले आहे, की मोदी हे यष्टीरक्षकाकडे पाहून फलंदाजी करतात, त्यामुळे त्यांना माहितच नसते की चेंडू कोठून येतोय.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ‘रियर व्ह्यू मिरर’ संबंधी वक्तव्य केल्यानंतर राहुल गांधी आता त्यांची क्रिकेटपटूशी तुलना केली आहे. मोदी हे असे क्रिकेटपटू आहेत जे, यष्टीरक्षकाकडे पाहत फलंदाजी करतात. त्यांना हे माहीत नसते की चेंडू कुठून येतोय. जर सचिन तेंडुलकरने यष्टीरक्षकाकडे पाहत फलंदाजी केली असतील तर त्याला धावा काढता आल्या असत्या का?

कर्नाटकमधील सभेत बोलताना राहुल यांनी मोदींना लक्ष्य केले. आमचे पंतप्रधान असे क्रिकेटर आहेत जे विकेटकिपरकडे पाहतात आणि त्यांना हेही माहीत नसते की चेंडू कुठून येत आहे. मोदी भविष्याविषयी बोलण्याऐवजी भूतकाळावरच बोलत आहेत. त्यांचा कार्यकाळ संपण्यास आता जास्त वेळ राहिला नसून, त्यांनी फक्त भाषणबाजी बंद करून काम करावे. पाच वर्षांत तुम्ही काय केले, हे तुम्हाला नागरिकांना सांगावे लागेल. 

Web Title: national news Rahul Gandhi likens pm Narendra Modi to batsman who bats looking at wicket keeper