भिडेंच्या अटकेत ‘पीएमओ’चा खोडा - आंबेडकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जानेवारी 2018

नवी दिल्ली - कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी गुन्हा नोंदवूनही संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांना अटक करण्यास राज्य सरकार अद्याप कचरत आहे. विशेषतः भिडे यांना अटक न करण्याच्या सूचना थेट दिल्लीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाकडून (पीएमओ) आल्याची माहिती आपल्याला मुंबईत राज्याच्या सचिवालयामधूनच समजली, असा खळबळजनक आरोप भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज येथे केला. 

या दोघांवरही कारवाईबाबत राज्य सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद अपेक्षित आहे. मात्र, तसा आला नाही, तर आपण याच मागणीसाठी दिल्लीत सभा घेऊ, असेही आंबेडकर यांनी सांगितले.आंबेडकर म्हणाले, की कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी जमलेली जनता, महाराष्ट्र बंदमध्ये सामील झालेले सुमारे २५० सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते व यांचा तथाकथित विकास अजेंडा यांचा काहीही पररस्पर संबंध नाही. शोषित व वंचित वर्गाचा मनापासून व खऱ्या अर्थाने विकास करणाऱ्या कोणत्याही शासनाला जगातील कोणीही अडथळे आणू शकत नाही. मात्र, या दोन्ही घटनांतील आरोपींना पकडण्याबाबत कच खाणाऱ्यांनी लोकशाही मार्गाने आंदोलनकर्त्यांवरच आरोप करणे विवेकबुद्धीला न पटणारे आहे. भिडे, एकबोटे व तत्सम लोकांच्या संघटना आज लोकनियुक्त सरकारांवरच नियंत्रण ठेवताना दिसतात. या परिस्थितीत पाकिस्तानातील हाफिज सईदला अटक न झाल्याबद्दल आम्हाला बोलण्याचा काय अधिकार आहे?

Web Title: national news sambhaji bhide pmo prakash ambedkar