नरेंद्र मोदी वर्गातला 'बॅड बॉय'; टीडीपी खासदार शाळकरी मुलाचा वेशात

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 मार्च 2018

टीडीपीकडून सरकारकडून आंदोलन सुरुच असून, सोमवारी एका टीडीपी खासदाराने साडी, मंगळसूत्र घालून संसदेत प्रवेश केला होता. त्यापूर्वी सरदार पटेल यांचा मुखवटा घालून तर मांत्रिकाचा वेश परिधान करून यांनी आंदोलन केले आहे. आजही शाळकरी मुलाचा गणवेश घालून संसदेत आलेल्या शिवाकुमार यांनी मोदींवर जोरदार टीका केली.  

नवी दिल्ली - आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यावरून तेलगू देसम पक्षाच्या (टीडीपी) खासदारांचे संसदेत आंदोलन सुरु असून, शाळकरी मुलाचा गणवेश घालून आलेले टीडीपीचे खासदार एन. शिवाकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करत मोदी हे वर्गातील बॅड बॉय असल्याचे म्हटले आहे.

केंद्र सरकार विरोधात अविश्‍वासदर्शक ठराव मांडण्यामध्ये आंध्र प्रदेशमधील वायएसआर कॉँग्रेस आणि तेलुगू देसम पक्ष (टीडीपी) या राजकीय पक्षांचा पुढाकार आहे. हे दोन्ही पक्ष केंद्र सरकारने आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा न दिल्याने नाराज आहेत. अविश्‍वासदर्शक ठरावासाठी सभागृहातील किमान ५० खासदारांचा पाठिंबा असण्याची अट आहे. सध्या लोकसभेतील एकूण ५३९ जागांपैकी (सभापती वगळता) भाजपकडे सध्या किमान २७२ जागांचे बळ आहे. याशिवाय भाजपला काही मित्रपक्षांचाही पाठिंबा आहे. यामुळे अविश्‍वासदर्शक ठराव मांडण्यात आल्यास सरकारला त्यामधून धोका निर्माण होणार नाही, असा अंदाज आहे.

टीडीपीकडून सरकारकडून आंदोलन सुरुच असून, सोमवारी एका टीडीपी खासदाराने साडी, मंगळसूत्र घालून संसदेत प्रवेश केला होता. त्यापूर्वी सरदार पटेल यांचा मुखवटा घालून तर मांत्रिकाचा वेश परिधान करून यांनी आंदोलन केले आहे. आजही शाळकरी मुलाचा गणवेश घालून संसदेत आलेल्या शिवाकुमार यांनी मोदींवर जोरदार टीका केली.  

Web Title: National news TDP MP Shiva Kumar criticize Narendra Modi