सोपोरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 जून 2017

आज पहाटे साडेतीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलिस आणि लष्कराच्या 21 राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांनी संयुक्तरित्या दहशतवाद्यांविरोधात हे अभियान राबविले.

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर गावातील नाथी पोरा भागात आज (गुरुवार) पहाटे सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत.

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाथी पोरा भागात एका घरात दोन दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर घेराव घालून ही कारवाई करण्यात आली. दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आले. या गोळीबारात दोन्ही दहशतवादी ठार झाले आहेत. या चकमकीत एकही जवान जखमी झालेला नाही. परिसरात शोधमोहिम सुरु आहे.

आज पहाटे साडेतीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलिस आणि लष्कराच्या 21 राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांनी संयुक्तरित्या दहशतवाद्यांविरोधात हे अभियान राबविले. सोपोरमध्ये बुधवारी पोलिसांच्या पथकावर ग्रेनेड हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात चार पोलिस जखमी झाले होते.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
एेतिहासिक शेतकरी संपाला महाराष्ट्रात सुरवात​
प्रांजल पाटील देशातील 'पहिली' दृष्टिहीन विद्यार्थिनी जिल्हाधिकारी
जनावरे खरेदी-विक्रीच्या निर्णयात हस्तक्षेप नाही- केरळ उच्च न्यायालय​
प्रशासकीय नव्हे; परराष्ट्र सेवेत जाणार​
करिअरसाठी स्काय इज द लिमिट​
मराठवाड्यात दीडशे दिवसांत 361 शेतकरी आत्महत्या​
मंत्री झालो याची शेट्टींना असुया..! - सदाभाऊ खोत​
अभिनेत्री सनी लिओनीच्या विमानाचा अपघात टळला

Web Title: national news Two terrorists killed in Kashmir's Sopore