आसाममध्ये मोठ्या प्रमाणावर घुसखोरी होत असल्याचे स्पष्ट

वृत्तसंस्था
सोमवार, 30 जुलै 2018

आसाममध्ये मोठ्या प्रमाणावर घुसखोरी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. देशाच्या सुरक्षेसाठी ही गंभीर बाब आहे. या पार्श्वभूमीवर, घुसखोरांसाठी सर्वांत सोयीचे ठिकाण असलेल्या आसाममध्ये किती घुसखोरांनी प्रवेश केला आहे. तसेच मुळचे भारतीय कोण आहेत, याची माहिती देणारे नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन (राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिका) यांनी आज एक मसुदा प्रसिद्ध केला.

गुवाहाटी - आसाममध्ये मोठ्या प्रमाणावर घुसखोरी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. देशाच्या सुरक्षेसाठी ही गंभीर बाब आहे. या पार्श्वभूमीवर, घुसखोरांसाठी सर्वांत सोयीचे ठिकाण असलेल्या आसाममध्ये किती घुसखोरांनी प्रवेश केला आहे. तसेच मुळचे भारतीय कोण आहेत, याची माहिती देणारे नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन (राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिका) यांनी आज एक मसुदा प्रसिद्ध केला.

या मसुद्यातील, यादीत राज्यातील 2 कोटी 89 लाख रहिवाशांना नागरिकत्वासाठी योग्य मानण्यात आले आहे. तर 40 लाख रहिवाशांची नावे या मसुद्यामधून बाहेर ठेवण्यात आली आहेत. या रहिवाशांना आपले नागरिकत्व सिद्ध करता आलेले नाही. ज्या रहिवाशांची नावे या यादीत नाहीत, त्यांचे पुढे काय होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दरम्यान, हा केवळ मसुदा असून, त्याला अंतिम रूप देण्यात आलेले नाही. ज्या रहिवाशांची नावे या मसुद्यात समाविष्ट केलेली नाहीत, त्यांना नागरिकत्वासाठी दावा करण्याचा आणि या निर्णयावर आक्षेप घेण्याची संधी मिळणार असल्याचे रजिस्ट्रार जनरल यांनी स्पष्ट केले आहे. एकूण 3 कोटी 29 लाख 91 हजार 380 रहिवाशांनी नागरिकत्वासाठी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी 2 कोटी, 89 लाख, 38 हजार 677 रहिवाशी नागरिकत्वासाठी योग्य असल्याचे निदर्शनास आले. 

नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनचा अंतिम मसुदा प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावरून राजकारण सुरू झाले आहे. तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी हा मुद्दा राज्यसभेत उपस्थित करून गोंधळ घातला. त्यामुळे राज्यसभेचे कामकाज काही काळासाठी स्थगित करावे लागले.

Web Title: National Register Of Citizens Draft Released In Assam