esakal | राष्ट्रीय नेमबाजपटू श्रेयसी सिंह भाजपत दाखल होणार
sakal

बोलून बातमी शोधा

bjp

माजी केंद्रीय मंत्री दिवंगत दिग्विजय सिंह यांची कन्या श्रेयसी सिंह भाजपत दाखल होणार आहे

राष्ट्रीय नेमबाजपटू श्रेयसी सिंह भाजपत दाखल होणार

sakal_logo
By
वृत्तसंस्था

पाटणा- माजी केंद्रीय मंत्री दिवंगत दिग्विजय सिंह यांची कन्या श्रेयसी सिंह भाजपत दाखल होणार आहे. श्रेयसी सिंह या राष्ट्रीय नेमबाजपटू आहेत. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या आई पुतुल सिंह या खासदार झाल्या होत्या. भाजपचे सरचिटणीस अरुण सिंह आणि प्रदेशाध्यक्ष संजय जायस्वाल यांच्या उपस्थितीत त्या भाजपचे सदस्यत्व घेतील. श्रेयसी सिंह यंदा बिहार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे बोलले जात आहे. 

श्रेयसी सिंह या राजकारणात उतरणार असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होती. सुरुवातीला त्या राष्ट्रीय जनता दलमध्ये (राजद) सहभागी होणार असल्याचे सांगितले जात होते. परंतु, आज (दि.4) त्या भाजपत दाखल होऊन आपली राजकीय कारकीर्द सुरु करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

सरकारच्या प्रयत्नांनी बलात्कार थांबणार नाहीत, मुलींवर चांगले संस्कार करा; भाजप...

श्रेयसी या राष्ट्रीय नेमबाज आहेत. 2018 मध्ये राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत त्यांनी सुवर्ण पदक जिंकले होते. त्यापूर्वी ग्लासगो येथे 2014 मध्ये झालेल्या राष्ट्रकूल स्पर्धेत नेमबाजीतील डबल ट्रॅप प्रकारात रौप्य पदक पटकावले होते. 

दरम्यान, श्रेयसी सिंह यांच्या आई पुतुल देवी या बांका येथून निवडणूक लढवत असत. 2014 मध्ये त्या खासदार झाल्या होत्या. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत जागा वाटपात बांका मतदारसंघ जदयूकडे गेला होता. यामुळे नाराज झालेल्या पुतुल सिंह यांनी जदयूच्या गिरधारी यादव यांच्याविरोधात अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यामुळे पक्षाने त्यांना 6 वर्षांसाठी निलंबित केले होते. 

त्यावेळी आई पुतुल सिंह यांच्या प्रचारासाठी श्रेयसी या निवडणुकीच्या मैदानात दिसल्या होत्या. त्याचवेळी त्या राजकारणात पाऊल टाकणार असल्याची चर्चा रंगली होती. दरम्यान, श्रेयसी या बांका किंवा जुमई विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे.