'जेईई' आणि 'नीट'ची परीक्षा आता वर्षातून दोनदा 

वृत्तसंस्था
शनिवार, 7 जुलै 2018

'जेईई' आणि 'नीट'ची परीक्षा आता वर्षातून दोनदा घेण्याची घोषणा मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज (ता.07) केली. या परीक्षा आता संगणकावर घेतल्या जातील तसेच, जेईईची परीक्षा जानेवारी आणि मार्च तर नीटची परीक्षा फेब्रुवारी आणि मे महिन्यात अशी वर्षातून दोनदा घेतली जाणार असल्याचे जावडेकर यांनी सांगितले आहे.

नवी दिल्ली- 'जेईई' आणि 'नीट'ची परीक्षा आता वर्षातून दोनदा घेण्याची घोषणा मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज (ता.07) केली. या परीक्षा आता संगणकावर घेतल्या जातील तसेच, जेईईची परीक्षा जानेवारी आणि मार्च तर नीटची परीक्षा फेब्रुवारी आणि मे महिन्यात अशी वर्षातून दोनदा घेतली जाणार असल्याचे जावडेकर यांनी सांगितले आहे.

प्रकाश जावड़ेकर यांनी सांगितले की, जेईई, नीट, यूजीसी आणि नेटच्या परिक्षांचे आयोजन आता नॅशनल टेस्टिंग एजन्सी करणार आहे. त्याचबरोबर, विद्यार्थी या परिक्षेचा सराव देखिल संगणकावर करु शकतात. तसेच, या परिक्षांच्या प्रशिक्षणासाठी देशात अधिकृत प्रशिक्षण केंद्रे उभारण्यात येणार आहेत. या प्रशिक्षण केंद्रावर मोफत प्रशिक्षण देण्यात येईल. यामध्ये अभ्यासक्रमात कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

संगणकावरती परीक्षा घेण्यात येणार असल्याने आता कॉपी करण्याचा प्रश्न येणार नसल्याचेही जावडेकर यांनी स्पष्ट केले. मानव संसाधन मंत्रालय उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात मोठे बदल करण्याचा निर्णय घेणार असल्याचे संकेतही जावडेकर यांनी दिेले.

केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाच्या या निर्णयाचे शिक्षण तज्ज्ञांनी स्वागत केले आहे. विद्यार्थ्यांना दोन संधी मिळणार असून ऑनलाइन परीक्षेचा दिनांक स्वत:ला निवडता येणार आहे, याचा फायदा विद्यार्थ्यांना होईल.

Web Title: National Testing Agency Conduct Neet Jee 2 Times In A Year Hrd Minister Prakash Javadekar