अ‍ॅग्रोवन ला राष्ट्रीय जल पुरस्कार

माध्यम श्रेणीत दुसरा क्रमांक; जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांची घोषणा
agrowon
agrowonsakal
Summary

माध्यम श्रेणीत दुसरा क्रमांक; जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांची घोषणा

नवी दिल्ली : जलसंधारणापासून ते हवामान बदलापर्यंत विविध विषयांवर ‘जल’जागृती करणाऱ्या ‘सकाळ ॲॅग्रोवन’ (sakal Agrowon)चा तिसऱ्या राष्ट्रीय जल पुरस्काराने गौरव (National Water Award)करण्यात आला आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत(Union Water Power Minister Gajendra Singh Shekhawat) यांनी विविध श्रेणीतील राष्ट्रीय जल पुरस्कारांची शुक्रवारी घोषणा केली. ‘सर्वोत्कृष्ट माध्यम’ (मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक) या गटात सकाळ माध्यम समूहाच्या(sakal media group) ‘ॲग्रोवन’ला राष्ट्रीय पातळीवर दुसरा क्रमांक मिळाला. सर्वोत्कृष्ट राज्य श्रेणीमध्ये उत्तर प्रदेशला प्रथम, राजस्थानला द्वितीय आणि तामिळनाडूला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

agrowon
Video: 'याचं उद्घाटन मी आधीच केलंय'; ममतांनी मोदींना थेट सुनावलं

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने दिल्या जाणाऱ्या २०२० साठीच्या जल पुरस्कारांची घोषणा शेखावत यांनी केली. जलसंपदा व्यवस्थापन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी जलसंपदा, नदीविकास आणि गंगा पुनरुत्थान, जलशक्ती मंत्रालय यांच्याकडून विविध राज्ये, संस्था, व्यक्ती आदींना ११ विविध श्रेणींमध्ये ५७ पुरस्कार दिले जातात. प्रशस्तिपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.

गेल्या १६ वर्षांच्या वाटचालीत ‘ॲग्रोवन’च्या माध्यमातून जलसंधारण, जल व्यवस्थापन, कार्यक्षम सिंचन व्यवस्थापन, जलसाक्षरता यासह पाणी वापर संस्थांची आदर्श कार्यपद्धती, पाणी विषयक शासनाच्या विविध योजना, धोरणे यांना प्रसिद्धी देण्यासह हजारो यशकथा प्रकाशित केल्या आहेत. सकाळ माध्यम समूहाच्यावतीने ‘ॲग्रोवन’च्या वर्धापनदिनानिमित्त २० एप्रिल २०१३ रोजी मुंबई येथे पाणी परिषद घेऊन ‘दुष्काळ मुक्त महाराष्ट्र’या संकल्पनेवर काम सुरू केले गेले. या परिषदेत तीनशेहून अधिक जलतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी सहभागी झाले होते. त्यानंतर घेण्यात आलेल्या व्यापक ‘वॉटर लॅब’मध्ये दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा व्यापक आराखडा करून तो सरकारला सादर करण्यात आला. तसेच २०१९ साली ‘जल व्यवस्थापन वर्ष’ साजरे करून पाण्याची कार्यक्षमता वाढविण्यासह पाणी बचतीचा राज्यभरात जागर करण्यात आला. शिवाय सरपंच महापरिषदांच्या माध्यमातून पाणी बचत आणि व्यवस्थापनाचा मंत्र शेकडो गावच्या पुढाऱ्यांना देण्यात आला. या कामाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे.‘सर्वोत्कृष्ट माध्यम’ या गटात प्रथम पुरस्कार ‘नेटवर्क १८‘च्या ‘मिशन पानी’ला, तर तिसरा पुरस्कार ‘संदेश’ दैनिकाच्या भूज आवृत्तीला मिळाला आहे.

agrowon
राज्यातील रुग्णसंख्या वाढली! दिवसभरात 40 हजारच्या पार रुग्णसंख्या

राज्याला चार पुरस्कार

महाराष्ट्राने एकूण चार राष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत. सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत गटात सोलापूर जिल्ह्यातील सुरडी ग्रामपंचायत देशात तिसरी, सर्वोत्कृष्ट शहरी स्थानिक संस्था गटात दापोली नगरपंचायतीला दुसरा क्रमांक मिळाला आहे, तर सर्वोत्कृष्ट स्वयंसेवी संस्था ग्रामविकास संस्थेला (औरंगाबाद) विभागून तिसरा क्रमांक मिळाला.

agrowon
150 कोटी लसीकरणाचा टप्पा पार; मोदी म्हणतात, 'अशक्यही शक्य...'

शेती, माती, जलसंधारणाच्या कामासाठी योगदान देणारे ‘ॲग्रोवन’ हे देशातील एकमेव लोकप्रिय दैनिक आहे. जलसंधारणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ यांसारख्या राबवलेल्या उपक्रमांत ‘ॲग्रोवन’चा मोठा सहभाग राहिला. ‘ॲग्रोवन’च्या जनजागृतीमुळे अनेक सरकारी योजना सफल झाल्या. हा पुरस्कार केवळ ‘ॲग्रोवन’चा नसून शेती, माती आणि पाण्याचा सन्मान आहे.

- पोपटराव पवार, कार्याध्यक्ष, आदर्श गाव योजना प्रकल्प व संकल्प समिती, महाराष्ट्र राज्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com