रेल्वे विद्यापीठाचे आज राष्ट्रार्पण

पीटीआय
शनिवार, 15 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : भारतातील पहिले रेल्वे विद्यापीठ गुजरातमधील बडोदा येथे साकारत असून, रेल्वेमंत्री पीयूष गोयल व गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्या हस्ते त्याचे शनिवारी (ता. 15) लोकार्पण होणार आहे. रशिया, चीननंतर भारतातील हे तिसरे अशाप्रकारचे विद्यापीठ आहे. 

नवी दिल्ली : भारतातील पहिले रेल्वे विद्यापीठ गुजरातमधील बडोदा येथे साकारत असून, रेल्वेमंत्री पीयूष गोयल व गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्या हस्ते त्याचे शनिवारी (ता. 15) लोकार्पण होणार आहे. रशिया, चीननंतर भारतातील हे तिसरे अशाप्रकारचे विद्यापीठ आहे. 

बडोद्यातील "द नॅशनल रेल्वे अँड ट्रान्सपोर्टेशन इन्स्टिट्यूट'ने सुरू केलेल्या या विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया सप्टेंबर महिन्यात झाली. यात दोन पदवी अभ्यासक्रम पूर्णवेळ व निवासी असून, पहिल्या तुकडीत 20 राज्यांतील 103 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आहे. यात 17 मुली व 86 मुले आहेत. बीबीएसाठी 41, तर 62 विद्यार्थ्यांनी बीएस्सी पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे. वाहतूक तंत्रज्ञानासाठी बीएस्सीची व वाहतूक व्यवस्थापन अभ्यासक्रमासाठी बीबीए पदवी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. "ट्रान्सपोर्टेशन अँड सिस्टिम्स डिझाईन', "ट्रान्सपोर्ट सिस्टिम्स इंजिनिअरिंग' व "ट्रान्सपोर्ट पॉलिसी अँड इकॉनॉमिक्‍स' या विषयांत पदव्युत्तर अभ्यासक्रम 2019-20 मध्ये सुरू करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. 

रेल्वे मंत्रालयाने या प्रकल्पासाठी 421 कोटी रुपये पुढील पाच वर्षांसाठी मंजूर केले आहेत. बदोद्यातील वाघोदिया तालुक्‍यातील पिपलिया गावात दहा एकरावर हे विद्यापीठ वसणार आहे. नवीन जागेसाठी गुजरात सरकारने जमीन हस्तांतरास सुरवात केली आहे. 

रेल्वे विद्यापीठाची वैशिष्ट्ये... 

- बीबीए व बीएसस्सी पदवी अभ्यासक्रम 
- 20 राज्यांमधून 103 विद्यार्थ्यांना प्रवेश 
- बीबीएसाठी 41, तर बीएस्सीसाठी 62 विद्यार्थी 
- रेल्वे मंत्रालयाकडून 421 कोटींची तरतूद 
 

Web Title: Nationalization of Railway University