ExitPolls 2019 : देशातील महत्त्वाच्या वृत्तपत्रांचे कव्हरेज

सोमवार, 20 मे 2019

भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) तीनशेपेक्षा अधिक जागा मिळतील असा अंदाज अनेक चाचण्यांतून व्यक्त करण्यात आला आहे. भारतातील प्रमुख वृत्तपत्रांनी कसे वार्तांकन केले आहे जाणून घेऊया...

नवी दिल्ली : जगातील सर्वांत मोठी लोकशाही म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील लोकसभा निवडणुकीचे सातही टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर रविवारी मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्झिट पोल) कल जाहीर झाले. या चाचण्यांमध्ये जवळपास सर्वच चाचण्यांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा सत्तेत बसणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. या विषयी आज (सोमवाऱ) देशभरातील वृत्तपत्रांनी वार्तांकन केले आहे.

भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) तीनशेपेक्षा अधिक जागा मिळतील असा अंदाज अनेक चाचण्यांतून व्यक्त करण्यात आला आहे. भारतातील प्रमुख वृत्तपत्रांनी कसे वार्तांकन केले आहे जाणून घेऊया...

 • 'आएँगे तो मोदी' या मथळ्याखाली सकाळ वृत्तपत्राने या एक्झिट पोलचे वार्तांकन केले आहे. तसेच सकाळने आपल्या बातमीत काँग्रेसच्या जागा वाढणार असल्याचेही म्हटले आहे. 
   
 • पुन्हा मोदी सरकार! या मथळ्याखाली लोकसत्ताने आपले वार्तांकन केले आहे. तसेच आपल्या बातमीत एक्झिट पोलनुसार एनडीए बहुमताच्या जवळ तर भाजपच्या जागा घटणार, तर राज्यात पुन्हा युतीचेच वर्चस्व राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
   
 • 'Exit polls predict another huge Modi win' या मथळ्याखाली टाईम्स ऑफ इंडियाने मोदीच पुन्हा मोठा विजय मिळवतील असे म्हटले आहे. भाजपप्रणित एनडीए पुन्हा सत्तेत बसणार हे यातून दिसत असल्याचे म्हटले आहे. 
   
 • 'All exit polls point to return of NDA' असे हेडिंग देत इंडियन एक्स्प्रेसने सर्वच मतचाचण्यांतून एनडीए पुन्हा सत्तेत येणार असे म्हटले आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेला असलेला 272 जागांचा आकडा एनडीए सहज पार करेल असा एक्झिट पोलचा अंदाज असल्याचेही त्यांनी लिहिले आहे.
   
 • 'Exit Polls predict victory for NDA; over to May 23' असे हेडिंग देत हिंदुस्तान टाईम्सने एनडीएचा विजय होत असून, आता लक्ष्य 23 मे कडे असे म्हटले आहे. एनडीएच्या विजयामुळे एक्झिट पोल या शब्दाला भगवा रंग देण्यात आला आहे. आठ एक्झिट पोल, सर्वेक्षणाची वेगवेगळी माध्यमे यातून मोदींच पुन्हा सत्तेत विराजमान होतील असे स्पष्ट झाल्याचे त्यांनी प्रसिद्ध केले आहे.
   
 • '#AayegaTohModiHi', say exit polls असे हेडिंग देत डीएनए इंडिा वृत्तपत्राने देशभरातील एक्झिट पोलने वर्तविलेला अंदाज ग्राफिक्सच्या माध्यमातून दाखविला आहे. एक्झिट पोलने एनडीए सरकार पुन्हा सत्तेत येत असल्याचे स्पष्ट केले आहे.
   
 • 'Exit polls predict second term for Modi' मोदी सरकार दुसऱ्यांदा सत्तेत येणार असे द हिंदू वृत्तपत्राने म्हटले आहे. पश्चिम बंगालसह उत्तरेत आणि पश्चिमेकडील राज्यांत एनडीएला बहुमत मिळेल असा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे.
   
 • 'एक्जिट पोल भी एक सुर में बोले-हां, मोदी ही मुमकिन' या मथळ्याखाली जागरण या हिंदी वृत्तपत्राने एक्झिट पोलचे वार्तांकन केले आहे. तसेच जागरणाने आपल्या बातमीत 'ध्यान में मोदी - रुझान में मोदी' असे म्हणत पुन्हा मोदी सरकार येणार असल्याचे म्हटले आहे.
   
 • 'सर्वे में एनडीए को बहुमत' असे हेडिंग देऊन दैनिक भास्करने आपले वार्तांकन केले आहे. तसेच आपल्या बातमीत भाजपला उत्तर प्रदेशात ३० जागांचा फटका बसणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. 
   
 • 'एक बार फिर मोदी सरकार' असे हेडिंग देऊन पंजाब केसरी या वृत्तपत्राने सर्व एक्झिट पोलनुसार एनडीए सरकार येणार असल्याचे म्हटले आहे.
   
 • 'Bengal Drives Modi comeback : polls' असे हेडिंग करून टेलिग्राफ या वृत्तपत्राने बंगाल पुन्हा सत्तेत येत असल्याचा एक्झिट पोलचा अंदाज असल्याचे म्हटले आहे. बंगाल आणि ओडिशामध्ये जास्त जागा मिळत असल्याने भाजपप्रणित एनडीए सरकार पुन्हा सत्तेत येत असल्याचे विश्लेषण यांनी केले आहे.
Web Title: nationwide coverage of exit polls of Loksabha 2019