‘नेव्हल ग्रुप’ अखेर ‘पी-७५ आय’ मधून बाहेर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Naval Group finally out P75i company objection to terms request proposal
‘नेव्हल ग्रुप’ अखेर ‘पी-७५ आय’ मधून बाहेर

‘नेव्हल ग्रुप’ अखेर ‘पी-७५ आय’ मधून बाहेर

नवी दिल्ली : फ्रेंच कंपनी ‘नेव्हल ग्रुप’ने केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून काढता पाय घेतला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून भारतीय नौदलासाठी सहा पारंपरिक पाणबुड्यांची निर्मिती केली जाणार होती. एअर इंडिपेडंट प्रॉपल्शन सिस्टिमच्या (एआयपी) अनुषंगाने घालण्यात आलेल्या अटींना ‘नेव्हल ग्रुप’ने आक्षेप घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फ्रान्सचे नवनिर्वाचित अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांची भेट घेणार आहेत त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय भारताला मोठा धक्का मानला जातो.

‘एआयपी सिस्टिममुळे पाणबुडीला अधिककाळ पाण्याखाली राहणे शक्य होते तसेच तिला वेगाने अंतर कापता येते. मागील वर्षी जून महिन्यामध्ये संरक्षण मंत्रालयाने ‘पी-७५ आय’ या प्रकल्पाला मान्यता दिली होती. यात खासगी क्षेत्रातील लार्सन अँड टुब्रो आणि सरकारी मालकीच्या माझगाव डॉक लिमिटेड या दोन कंपन्यांना सामावून घेण्यात आले होते. या दोन भारतीय कंपन्यांसमोर भागीदारी करण्यासाठी पाच परकी कंपन्यांच्या नावांचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता, त्यातील एकीची निवड करणे अपेक्षित होते.

याबाबत तक्रार

भारत सरकारने त्यांच्या विनंती प्रस्तावामध्ये फ्युएल सेलची समुद्रामध्ये चाचणी घेतली जाणे गरजेचे असल्याचे म्हटले होते पण फ्रान्सचे नौदल हे अशाप्रकारच्या कोणत्याही प्रॉपल्शन सिस्टिमचा वापर करत नाही, असे कंपनीकडून सांगण्यात आले. आम्ही या ताज्या करारातून माघार घेतली असली तरीसुद्धा भारतासोबतचे आमचे सहकार्य कायम राहील असे कंपनीने म्हटले आहे.