'आयएनएस विक्रमादित्य'ला आग; नौदलातील अधिकारी हुतात्मा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

कर्नाटकातील करवार येथे 'आयएनएस विक्रमादित्य'ला लागली आग. 

बंगळुरू : कर्नाटकातील करवार येथे भारतीय नौदलातील जहाज 'आयएनएस विक्रमादित्य'ला आग लागली. या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अधिकारी-कर्मचाऱ्यांना यश आले आहे. मात्र, ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करणारा नौदलातील अधिकारी हुतात्मा झाला.

लेफ्टनंट कमांडर डी. एस. चौहान असे यामध्ये हुतात्मा झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. चौहान हे आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यादरम्यान ते बेशुद्ध झाले. त्यानंतर त्यांना करवार येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा यामध्ये मृत्यू झाला, अशी माहिती नौदल अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. तसेच ही आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत चौकशी समितीकडून तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहे, असेही यावेळी सांगण्यात आले आहे. 

दरम्यान, यापूर्वी 2016 मध्ये विषारू गॅस लिक झाल्याने मोठी दुर्घटना घडली होती. त्यामध्ये दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता ही घटना घडली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Naval Officer Dies In Fire Onboard INS Vikramaditya In Karnataka