Amritsar Rail Accident : माझ्या डोळ्यांदेखत घटना घडली नाही : नवज्योत कौर सिद्धू

Amritsar Rail Accident : माझ्या डोळ्यांदेखत घटना घडली नाही : नवज्योत कौर सिद्धू

नवी दिल्ली : अमृतसर येथे झालेल्या रेल्वे अपघातानंतर पंजाबचे कॅबिनेटमंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नी माजी आमदार नवज्योत कौर सिद्धू यांनी या रेल्वे अपघातादरम्यान आपण नजीक नसल्याचे स्पष्टीकरण दिले. तसेच हा रेल्वे अपघात माझ्या डोळ्यांदेखत झाला नाही, असेही त्यांनी सांगितले.

पंजाबच्या अमृतसर येथील जोडा फाटक येथे लोहमार्गाच्या शेजारील मोकळ्या जागेत रावणदहनाचा कार्यक्रम काल (शुक्रवार) आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान 61 हून अनेकांचा मृत्यू झाला, तर 72 जण जखमी झाले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून कौर उपस्थित होत्या. अपघात झाल्यानंतर नवज्योत कौर सिद्धू न थांबता तशाच पळून गेल्या असा आरोप प्रत्यक्षदर्शींकडून केला जात होता. यावर कौर यांनी स्पष्टीकरण दिले असून, त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले.

कौर म्हणाल्या, मी जेव्हा तेथे गेले तेव्हा पोलिस उपस्थित नव्हते. मात्र, मी तेथून गेल्यानंतर मला समजले, की रेल्वे रुळावर थांबलेल्या लोकांची धावपळ सुरु झाली होती. मात्र, ही दुर्घटना माझ्या डोळ्यांदेखत झाली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com